जाहिरात-9423439946
आरोग्य

माहेगाव देशमुख येथे कोविड तपासणी संपन्न

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख ग्रामपंचायत हद्दीत राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या “माझे कुटुंब,माझी जबाबदारी”या योजनेत ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांच्या कुटुंबातील सदस्यांची टाकळी आरोग्य केंद्राच्या वतीने आरोग्य तपासणी करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी गोरक्षनाथ शेळके यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात येत्या १५ सप्टेंबर पासून ‘माझे कुटुंब,माझी जबाबदारी’ ही जनजागृती मोहीम दोन टप्प्यात राबविण्यात येत आहे. या जनजागृती मोहिमेला लोकप्रतिनिधी,सर्व महानगरपालिका,नगरपालिका,नगरपंचायत,ग्रामपंचायत,गावोगावच्या दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्थांनी मोहिमेत सहभागी होणे अभिप्रेत होणे गरजेचे आहे.या मोहिमेचा पहिला टप्पा १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरपर्यंत आणि दुसरा टप्पा १२ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर असा संपन्न होत आहे.यामध्ये घरोघरी जाऊन आरोग्य विषयक चौकशी केली जाणार आहे.यात दोन कर्मचाऱ्यांचे-वयंसेवकांचे एक पथक असेल.हे पथक एका दिवसात ५० घरांना भेटी देईल. या पथकामध्ये एक शासकीय कर्मचारी,आशा सेविका आणि दोन स्थानिक स्वयंसेवक यांचा समावेश आहे.ही मोहीम सार्वजनिक आरोग्य,नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग, महिला व बालकल्याण विभाग यांच्या मार्फत राबविण्यात येत आहे आणि महानगरपालिका, नगरपालिकांमध्ये,नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र याचे नियोजन करत आहे.माहेगाव देशमुख ग्रामपंचायत हद्दीत टाकळी प्राथमिक आरोग्य केंद्र हि तपासणी मोहीम राबवित आहे.त्याचा शुभारंभ नुकताच सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे यांच्या हस्ते करण्यात आला आहे.त्यात ग्रामविकास अधिकारी गोरक्षनाथ शेळके यांनी स्वतः पासून या तपासणी योजनेची सुरुवात केली आहे.त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close