जाहिरात-9423439946
जगावेगळे

अहो आश्चर्यम! ग्राहकांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

उन्हाळा व दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन कोपरगाव शहर व्यापारी महासंघाने आठवड्याच्या दिवशी बाजारात येणाऱ्या ग्राहक आणि व्यापाऱ्यांसाठी जागेवर पिण्याचे पाणी पुरविण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला असल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

“व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट असोसिएशन कोपरगाव तालुक्यातील ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असतात.यावर्षी प्रत्येक आठवड्याला या चालत्या फिरत्या पाणपोई द्वारा ग्राहक दुकानदारांना जागेवर पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देणार आहे”-ओमप्रकाश कोयटे,अध्यक्ष,कोपरगाव व्यापारी महासंघ.

भारतात पाण्याचे संकट अधिक आहे,कारण संसाधनांचे चुकीचे व्यवस्थापन,लोकांचा पाण्याच्या वापराकडे पाहण्याचा दृष्टीकोन होय,त्यात भर म्हणून,अनियमित मान्सून देखील आहे.त्यामुळे आगामी काळात पाणी जपून वापरणे गरजेचे बनले आहे.उन्हाळयात तर याची तीव्रता अधिक जाणवते त्यामुळे नेमकी ही गरज ओळखून कोपरगाव व्यापारी महासंघाने या उन्हाळ्यात एक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेऊन कोपरगाव शहरातील आठवडे बाजारात येणाऱ्या ग्राहक आणि व्यापाऱ्यांसाठी जागेवर पाणी देण्याचा कौतुकास्पद उपक्रम हाती घेतला आहे.ग्रामीण भागातून बाजारात येणारा ग्राहक हा स्थानिक व्यापारी दुकानदार यांच्याकडून देखील खरेदी करत असतो.सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून आठवडे बाजारात येणाऱ्या ग्राहक,दुकानदाराला पिण्यासाठी जागेवर मोफत थंडगार पाण्याची सोय कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट असोसिएशन करणार असल्याचे कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी आमच्या प्रतिनिधीही बोलताना दिली आहे.


    समता नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक कांतीलाल हरलाल जोशी यांच्या शुभ हस्ते चालत्या फिरत्या पाणपोईचे उद्घाटन समता नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक चांगदेव शिरोडे,किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमारजी बंब, व्यापारी महासंघाचे सचिव प्रदीप साखरे,नारायण अग्रवाल,महावीर सोनी यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील बाजार तळ या ठिकाणी करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.
   ते पुढे म्हणाले की,व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट असोसिएशन कोपरगाव तालुक्यातील ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना व उपक्रम राबवत असतात. किराणा दुकानदार व व्यापारी तसेच ग्राहकांसाठी राबविण्यात आलेला हा एक आगळावेगळा अनोखा उपक्रम आहे.प्रत्येक आठवड्याला या चालत्या फिरत्या पाणपोई द्वारा ग्राहक दुकानदारांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देणार आहे.
   या वेळी व्यापारी महासंघाच्या बाजार तळ शाखेचे अध्यक्ष आशिष लोढा,हर्षल जोशी, अनिकेत भडकवाडे,संकेत दरक,हर्षल कृष्णानी,धीरज कराचीवाला,प्रकाश वाणी, कैलास नागरे,अरुण उदावंत,राहुल शिंदे,संतोष कासलीवाल आदी व्यापारी व दुकानदार बहुसंख्येने उपस्थित होते.उपस्थितांचे आभार किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमारजी बंब यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close