जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुकाशैक्षणिक

सोमैय्या महाविद्यालयात नवीन अभ्यासक्रमांना मंजुरी

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

नवी दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोग यांनी नॅशनल स्किल्स क्वालिफिकेशन्स फ्रेमवर्क अंतर्गत येथील के.जे.सोमैया कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास चालू शैक्षणिक वर्षापासून हेल्थ केअर-मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी,आय.टी.-केमिकल अँड पेट्रोकेमिकल्स,इंडस्ट्रियल केमिस्ट्री व मल्टिमीडिया अँड ग्राफिक्स डिझाईन हे कौशल्याधिष्ठित पदवी तसेच पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मंजुरी दिल्याची माहिती प्राचार्य डॉ.बी. एस. यादव यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

विद्यापीठ अनुदान आयोग ही भारतातील विद्यापीठीय शिक्षणावर नियंत्रण ठेवणारी देशातील सर्वोच्च संस्था आहे.विद्यापीठ अनुदान आयोगाची शिक्षण क्षेत्रातील भूमिका महत्त्वाची मानली जाते.केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय यांच्या अखत्यारीत हा आयोग येतो.उच्च शिक्षणाला दिशा देण्याचे कार्य हा आयोग करत असतो.शैक्षणिक क्षेत्रातील खालील गोष्टींमध्ये गुणवत्ता राखणे हे विद्यापीठ अनुदान आयोगाचे उद्दिष्ट आहे.

या आयोगाची स्थापना २८ डिसेंबर इ.स. १९५३ रोजी करण्यात आली.इ.स.१९४८ मध्ये डॉ. एस. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या विद्यापीठ शिक्षण आयोगाने विद्यापीठ अनुदान आयोग स्थापनेची शिफारस केली. इ.स.१९५३ मध्ये तत्कालीन शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम यांच्या हस्ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे उद्घाटन झाले.केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय यांच्या अखत्यारीत हा आयोग येतो. उच्च शिक्षणाला दिशा देण्याचे कार्य हा आयोग करत असतो.शैक्षणिक क्षेत्रातील खालील गोष्टींमध्ये गुणवत्ता राखणे हे विद्यापीठ अनुदान आयोगाचे उद्दिष्ट आहे.या महाविद्यालयाला नवीन अभ्यासक्रमांना मान्यता मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

याबाबत पुढे माहिती देताना प्रचार्य डॉ.यादव पुढे म्हणाले की,”नॅक या बंगलुरु स्थित भारत सरकारच्या समितीने महाविद्यालयास लागोपाठ दुसऱ्यांदा ‘अ’ श्रेणी मानांकन दिल्यानंतर ही संस्था व महाविद्यालयाचा कोपरगाव सारख्या ग्रामीण भागातील हुशार,गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी आणखी नवनवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचा संस्थेचा मानस होता व त्या अनुषंगाने आमचे सतत प्रयत्न सुरू होते.त्याला यश मिळाल्याचे समाधान आहे.यासाठी आम्हाला कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सचिव ऍड. संजीव कुलकर्णी व सदस्य संदीप रोहमारे यांचे सतत प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळत असते. त्याचेच हे फळ असल्याचेही प्राचार्य डॉ. यादव म्हणाले. याबद्दल संस्थेने प्राचार्य डॉ.बी.एस.यादव,नॅक समन्वयक डॉ.एस.आर.पगारे,आय.क्यू.ए.सी.प्रमुख प्रा.व्ही.सी ठाणगे,डॉ.जी.के. चव्हाण,कार्यालयीन अधीक्षक डॉ.ए.सी.नाईकवाडे, संजय पाचोरे तसेच सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close