जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगाव पालिका पहिल्या कोरोना योध्याचे निधन!

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषदेचे सफाई कामगार राजेंद्र प्रभाकर साबळे (वय-५९) यांचे कोरोनाने आज पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात पत्नी,२ मुले,५ मुली,नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून कोपरगाव शहराच्या नागरिकांच्या आरोग्य रक्षणार्थ आरोग्य विभागाचा पहिला बळी नोंदवला गेला आहे.त्यामुळे कोपरगाव पालिका अधिकारी,कर्मचारी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

कोपरगाव नगरपरिषदेच्या आरोग्य सेवेत ते सन-१९९० मध्ये सेवेत आले होते.ते दि.१ऑगष्ट रोजी नगरपरिषदेच्या सेवेत असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना कोपरगाव येथील कोविड सेंटर मध्ये उपचारार्थ भरती करण्यात आले होते.मात्र त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना नगर येथे चार दिवसापूर्वी हलविण्यात आले होते.

कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या १०५१ इतकी झाली आहे.त्यात १५७ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज पर्यंत १८ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.७१ टक्के आहे.आतापर्यंत ०४ हजार ६७६ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला १८ हजार ७०४ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर २२.४७ असा आढळला आहे त्यातच ही दुर्दैवी घटना घडली आहे.

कोपरगाव नगरपरिषदेच्या आरोग्य सेवेत ते सन-१९९० मध्ये सेवेत आले होते.ते दि.१ऑगष्ट रोजी नगरपरिषदेच्या सेवेत असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना कोपरगाव येथील कोविड सेंटर मध्ये उपचारार्थ भरती करण्यात आले होते.मात्र त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना नगर येथे चार दिवसापूर्वी हलविण्यात आले होते तेथेही आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांना वाचविण्याची शर्त केली मात्र त्यांची झुंज अपयशी ठरली आहे.व आज सकाळी ४.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

त्यांच्यावर नगर येथें अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.अशी माहिती कोपरगाव नगरपरिषद आरोग्य अधिकारी सुनील आरणे यांनी दिली आहे.जा उशिरा पर्यंत अंत्यविधी होणार आहे.त्यांच्या निधनाने आ.आशुतोष काळे, कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे,उपनगराध्यक्ष योगेश बागुल,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,गटनेते विरेन बोरावके व सर्व नगरसेवक,कोपरगाव नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत साठे,पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र गाडे आदींनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close