जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोविड केंद्राला फळांचे वाटप संपन्न

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगांव तालुक्यातील कोरोना संसर्ग बाधित सर्वसामान्य जनतेला वरदान ठरत असलेल्या श्री सदगुरु गंगागिर महाराज महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरला रुग्णांना लाँयन हार्ट ग्रुप कडून तालुका वैद्यकीय अधिकारी संतोष विधाते,विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली बडदे,स्वच्छतादूत व समन्वयक सुशांत घोडके यांचे प्रमुख उपस्थितीत फळांचे वाटप करण्यात आले आहे.

डिसेंबर मध्ये चीनमधील वुहान प्रांतात सुरू झालेली ‘कोव्हिड १९’ची साथ पाहता-पाहता जगभर पसरली. जवळपास नऊ लाख लोक या संसर्गाने मृत्युमुखी पडले. भारतामध्ये तीस लाख कोव्हिडबाधित रुग्ण गेल्या पाच महिन्यांत सापडले असून, साठ हजारहून अधिक भारतीयांचा बळी करोनाने घेतला आहे. आपण पहिले दोन महिने लॉकडाउन केल्याने काही प्रमाणात जीवितहानी टळली असली तरी अद्याप धोका टळलेला नाही या साठी नागरिकांनी आपली प्रतिकार क्षमता वाढविणे क्रमप्राप्त आहे.

डिसेंबर २०१९मध्ये चीनमधील वुहान प्रांतात सुरू झालेली ‘कोव्हिड १९’ची साथ पाहता-पाहता जगभर पसरली. जवळपास नऊ लाख लोक या संसर्गाने मृत्युमुखी पडले. भारतामध्ये तीस लाख कोव्हिडबाधित रुग्ण गेल्या पाच महिन्यांत सापडले असून, साठ हजारहून अधिक भारतीयांचा बळी करोनाने घेतला आहे. आपण पहिले दोन महिने लॉकडाउन केल्याने काही प्रमाणात जीवितहानी टळली असली तरी अद्याप धोका टळलेला नाही या साठी नागरिकांनी आपली प्रतिकार क्षमता वाढविणे क्रमप्राप्त आहे.त्यासाठी फळे आपल्या आहारात असणे गरजेचे आहे हि गरज ओळखून कोपरगाव कोविड सेंटरला हि मदत देण्यात आली आहे.

कोपरगांव कोविड केअर सेंटरला अनेक सेवाभावी संस्था व कोरोना संसर्गातून येथील कोविड केअर मधून बरे झालेल्या रुग्नांनी मदतीचा हात पुढे केला आहे. याचाच एक भाग म्हणून लाँयन हार्ट नावाच्या महाविद्यालयीन तरुणांच्या ग्रुपने स्वतःच्या वाढदिवसातून साचवलेल्या पैशातून कोपरगांवच्या कोविड केअर सेंटरला पौष्टिक आहार म्हणून दोन पोती फळे भेट दिली आहे.
या उपक्रमात लाँयल हार्ट ग्रुपचे ऐश्वर्या बोरावके,रिध्दी दौंड,सार्थक काशिद,सत्येम बोरावके,ईशा कोल्हे,सायली ईनामके यांनी सहभाग घेतला आहे. उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे,तहसिलदार योगेश चंद्रे यांनी या तरुणांच्या सामाजिक बांधिलकी बद्दल प्रशासनाच्या वतीने आभार मानले आहे. या मुलांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close