जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगाव मतदारसंघात उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी द्या-मागणी

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

विधानसभा निवडणुकीनंतर मतदार संघाच्या विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करून हे प्रश्न तातडीने मार्गी लागावे यासाठी हिवाळी व अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विकासाचे अनेक प्रश्न उपस्थित करून या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले आहे.आता अधिवेशन होणार नसल्याने आपण मंत्र्यांना भेटून कोपरगावात उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी देण्यासह महत्वाचे प्रश्न मार्गी लावू असा विश्वास कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आ.आशुतोष काळे यांनी व्यक्त केला आहे.

अधिवेशनात इतर अधिवेशनाप्रमाणे कुणाही विधानसभा सदस्याला प्रश्न मांडण्यास परवानगी देण्यात आलेली नसून त्यामुळे साहजिकच मतदार संघातील प्रश्न मांडता येणार नाही.मात्र जे प्रश्न सभागृहात उपस्थित करावयाचे होते ते प्रश्न त्या त्या खात्याच्या मंत्र्यांना भेटून सोडविता येवू शकतात त्यामुळे प्रश्न सोडविण्यासाठी अडचण येणार नाही-आ.काळे

कोपरगाव विधानसभा निवडणुका संपन्न झाल्या नंतर काही दिवस सरकार स्थापन करण्यासाठी गेले व त्या पाठोपाठ कोरोनाचे जगव्यापी संकट हजर झाल्याने अनेक प्रश्न मांडताना अडचणी आल्या आहेत.मतदार संघाच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी अजूनही अनके प्रश्न पावसाळी अधिवेशनात सभागृहासमोर मांडायचे होते.मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशन दोनच दिवसाचे असल्यामुळे हे प्रश्न जरी मांडता येणार नसले तरी विकासाच्या बाबतीत मतदार संघाच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आपण संबंधित खात्याच्या मंत्र्यांना समक्ष भेटून हे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आ.काळे यांनी म्हटले आहे
सध्या जगभर थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूच्या साथीने सर्वच सार्वजनिक कार्यकमांबरोबरच अनेक गोष्टींवर बंधने घालण्यात आली असून कोरोना विषाणूचा प्रार्दुर्भाव रोखण्यासाठी मागील महिन्यात होणारे पावसाळी अधिवेशन होते की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र हे अधिवेशन दि. ७ व ८ संप्टेंबर रोजी होणार असले तरी या अधिवेशनात इतर अधिवेशानाप्रमाणे कुणाही विधानसभा सदस्याला प्रश्न मांडण्यास परवानगी देण्यात आलेली नसून त्यामुळे साहजिकच मतदार संघातील प्रश्न मांडता येणार नाही.मात्र जे प्रश्न सभागृहात उपस्थित करावयाचे होते ते प्रश्न त्या त्या खात्याच्या मंत्र्यांना भेटून सोडविता येवू शकतात त्यामुळे प्रश्न सोडविण्यासाठी अडचण नाही.आजपर्यंत उपस्थित केलेल्या प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधून संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे या प्रश्नांना चालना मिळाली असल्याचा त्यांनी दावा केला आहे.

कोपरगाव विधानसभा मतदार संघात अजूनही महत्वाचे प्रश्न अनुत्तरीत आहे.यामध्ये कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाच नंबर साठवण तलावाच्या पुढील कामासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता भासणार आहे.मतदार संघातील अनके पाणीपुरवठा योजनांचे बजेट वाढल्यामुळे या योजनांना सुधारित प्रशाकीय मान्यता मिळणे गरजेचे आहे.नवीन प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांना मंजुरी मिळवून या योजनांना निधीची तरतूद व्हावी. ब्राम्हणगाव येथील प्रस्तावित असलेल्या वीज उपकेंद्रासाठी निधी व चांदेकसारे परिसरासाठी नवीन उपकेंद्र मंजुरी मिळावी.अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना अडचणीत बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत अपेक्षित दर मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल आंतरराज्य व आंतरराष्ट्रीय पातळीवर गेला पाहिजे त्यासाठी कार्गो सेवा सुरु करावी.हवामान आधारित पिक विम्याचा अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही त्यासाठी लावण्यात आलेल्या निकषांमध्ये बदल करावा.मतदार संघात हवामानयंत्रांची संख्या वाढवावी.वारी येथील पुलाची भक्कमपणे दुरुस्ती करून गोदावरी नदी ओलांडून जाणाऱ्या उत्तर-दक्षिण रस्त्यावरील वेळापूर-मायगाव देवी,सुरेगाव-सांगवी भुसार,डाऊच बु.,चांदगव्हाण या ठिकाणी गोदावरी नदीवर पूल बांधण्यास मंजुरी द्यावी.कोपरगाव विधानसभा मतदार संघातील गरजू रुग्ण दुर्धर आजारांवर उपचार घेण्यासाठी जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे जावू शकत नाही त्यासाठी कोपरगाव येथे १०० बेडचे उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी द्यावी. व मतदार संघातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांना अद्यावत रुग्णवाहिका देण्यात याव्या.आदी प्रश्न पावसाळी अधिवेशनात मांडून हे प्रश्न मार्गी लावायचे होते. मात्र प्रश्न मांडण्याची परवानगी नसल्यामुळे हे प्रश्न मांडता येणार नाहीत. आजपर्यंत अधिवेशनात विकासाचे प्रश्न मांडण्याबरोबरच महाविकास सरकारच्या प्रत्येक खात्याच्या मंत्र्यांना भेटून विकासाचे रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे.त्यामुळे जरी अधिवेशनात प्रश्न मांडण्यासाठी परवानगी नसली तरी संबंधित खात्याच्या मंत्र्यांना भेटून हे प्रश्न मार्गी लावले जातील असा विश्वास आ.काळे यांनी व्यक्त केला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close