आरोग्य
कोपरगावात मोठी रुग्णवाढ सुरूच!
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर व तालुक्यात काल २० रुग्ण वाढीचा उच्चान्क वाढला असताना आज कोपरगाव तालुक्यात एकूण १०१ अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून त्यात ३३ रुग्ण बाधित निघाले तर नगर येथील ३४ अँटीजन रॅपिड टेस्ट मध्ये तपासणीत एकही बाधित आढळला नाही तर खाजगी प्रयोग शाळेत खडकी येथील ०१ पुरुष असे एकूण ३४ बाधित रुग्ण आढळले असून १८ संशयित रुग्णांना घरी सोडून दिले आहे. बाधित रुग्णांत पोहेगाव येथील प्राथमिक रुग्णालयातील एक आरोग्य कर्मचारी बाधित आढळल्याने ते केंद्र तीन दिवस बंद राहणार असंल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी कृष्णा फुलसौन्दर यांनी दिली आहे.
नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा २३ हजार २२२ वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ३३१ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील १८ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत काही दिवसात अनेक प्रमुख मान्यवरांना आपले प्राण गमवावे लागले आहे. सलग प्रतिदिन मृत्यूची नोंद वाढत चालली आहे.त्यामुळे नागरिकांची चिंता वाढत चालली आहे.
आज आलेल्या यादीत शहरात बाधित रुग्णांची संख्या २५ तर ग्रामीण भागात ०९ असे रुग्ण बाधित निघाले असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान आज आलेल्या बाधित रुग्णांची यादी पुढील प्रमाणे सुभद्रानगर पुरुष वय-४८,लक्ष्मीनगर पुरुष वय-३१,अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ एक पुरुष वय-३८,खडकी सहा पुरुष वय-२१,१९,१९,३८,६०,५० तर तीन महिला वय-४०,५५,४० साई सिटी महिला वय-४०,शिवाजी रोड पुरुष वय-३७,तेली गल्ली दोन पुरुष वय-४४,१० तर तीन महिला वय-३६,१६,१२ यांचा समावेश आहे,अंबिकानगर येथील एक महिला वय-२५,काले मला एक महिला वय-२५,कोपरगाव बेट एक पुरुष वय-३३,निवारा एक महिला वय-२८,हनुमाननगर पुरुष वय-३२,गजानन नगर एक पुरुष वय-८३,जैन मंदिर परिसर एक महिला वय-९ तर खाजगी प्रयोग शाळेत एक पुरुष वय-५० बाधित निघाला आहे असे शहरात एकूण २५ रुग्ण बाधित निघाले आहे.
तर ग्रामीण भागात जेऊर कुंभारी एक पुरुष वय-२८,ब्राम्हणगाव एक महिला वय-४९,चांदेकसारे एक महिला वय-२५,चासनळी येथे सहा महिला बाधित निघाल्या असून त्यात एक तीन व चौदा वर्षीय दोन बालक तर तर अन्य चार महिला वय-५०,२७,२३,३१ आदींचा समावेश आहे.
दरम्यान आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या १००४ इतकी झाली आहे.त्यात १७८ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज पर्यंत १८ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.७९ टक्के आहे.आतापर्यंत ०४ हजार ५६५ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला १८ हजार २६० इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर २१.०९ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ८०८ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ८०.८७ टक्के झाला आहे.दरम्यान या आकडेवारीमुळे नागरिकांत पुन्हा एकदा भीती निर्माण झाली आहे.