जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोरोना संसर्ग निर्मुलन अभियानाचे प्रशिक्षण संपन्न

जाहिरात-9423439946
जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगांव शहरात कोरोना संसर्ग आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोपरगाव शहर आरोग्य विभाग व कोपरगाव तालुका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगांव शहरात कोरोना संसर्ग निर्मुलन अभियाना राबविण्यासाठी आरोग्य कर्मचारी व आरोग्यसेविका व आशा सेविका आदींसाठी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला आहे.


नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा २१ हजार ०९१ वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत २९८ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील १८ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत चार दिवसात अनेक प्रमुख मान्यवरांना आपले प्राण गमवावे लागले आहे. सलग प्रतिदिन मृत्यूची नोंद वाढत चालली आहे.

नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा २१ हजार ०९१ वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत २९८ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील १८ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत चार दिवसात अनेक प्रमुख मान्यवरांना आपले प्राण गमवावे लागले आहे. सलग प्रतिदिन मृत्यूची नोंद वाढत चालली आहे.आज आलेल्या यादीत शहरात ४४ तर ग्रामीण भागात १४ रुग्ण बाधित निघाले असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.या पार्श्वभूमीवर हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी तहसिलदार योगेश चंद्रे,गट विकास अधिकारी सचिन सुर्यवंशी,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,पोलिस निरीक्षक राकेश मानगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.ग्रामीण रुग्णालय,कोपरगांव,डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र,कोपरगांव, आरोग्य विभाग पंचायत समिती कोपरगांव यांचे यंत्रणेमार्फत हे अभियान होणार आहे. कोपरगांव शहरातील आशा सेविका,अंगणवाडी सेविका,आरोग्य सेविका, बहुउद्देशिय आरोग्य सेवक,शिक्षक अशा ७५ जणांना एकदिवसीय विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. कोरोना संसर्ग बाधित रुग्ण प्रमाण वाढत असलेल्या उपनगरात विशेष लक्ष केंद्रित केले गेले आहे.यात गांधीनगर,महादेवनगर,गोरोबानगर,दत्तनगर, टिळकनगर,विवेकानंद नगर,सप्तर्षीमळा,कालेमळा,सुभाषनगर,संजयनगर,समतानगर,निवारा,सुभद्रानगर या उपनगरांचा समावेश करण्यात आला होता. चार दिवस कोपरगांव शहरात टाळेबंदीच्या काळात सुरु करण्यात आलेल्या या अभियानात आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी सर्वेक्षण केले आहे. यात मधुमेह,दमा,क्षयरोग तसेच सर्दी,खोकला,ताप आजाराने बाधित रुग्नांची कोरोना लक्षण संदर्भात प्राथमिक तपासणी केली जाणार आहे.जेणे करुन अशा दुर्धर आजाराने बाधित त्या रुग्णास दिलासा मिळेल.प्रशिणार्थींची १७ पथके तयार करण्यात आली असून ६ नियंत्रण अधिकारी नेमण्यात आले आहे. कोपरगांव शहरातील रुग्णांच्या घरापर्यंत पोहचून तपासणी,पुढील उपचार आणि समुपदेशन केले गेले आहे.या कृती कार्यक्रमाची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. या प्रसंगी निवासी नायब तहसिलदार योगेश कोतवाल उपस्थित होते. प्रशिक्षण कार्यशाळेचे सुत्रसंचलन समन्वयक सुशांत घोडके,तर आभार साथ नियंत्रण अधिकारी सचिन जोशी यांनी मानले.कोपरगांव प्रशासन आणि वैद्यकीय विभागाने टाकलेल्या या क्रांतिकारक पाऊलाचे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close