जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात रुग्ण वाढीचा उद्रेक,महिलेचे निधन

जाहिरात-9423439946
जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


कोपरगाव शहर व तालुक्यात सलग चार दिवस कोरोना वाढीचा नवनवे उच्चांक गाठत असताना व आज गोरोबा नगर परिसरातील एक ६५ वर्षीय महिलेचे कोरोनाने निधन होऊन आता मृत्यूसंख्या १८ झाली आहे.दरम्यान कोपरगाव तालुक्यात एकूण ५५ अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून त्यात २० रुग्ण बाधित निघाले असून नगर येथील तपासणीत ७९ पैकी ३९ बाधित आढळून एकूण बाधितांची संख्या शहरात ४४ तर ग्रामीण भागात १४ अशी एकूण ५९ झाली आहे तर उपचारानंतर २४ जणांना घरी जाण्यास सोडून देण्यात आले आहे.तपासणीत तर ४० जण निरंक निघाल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी कृष्णा फुलसौन्दर यांनी दिली आहे.


कोरोना विषाणूने जगभर कहर उडवून दिला आहे.देशभरात ०७ हजार ३७५ रुग्णांची वाढ होऊन बाधित रुग्णांचा आकडा ३७ लाख ७३ हजार ४८३ वर गेला आहे व कोरोना बाधित नागरिकांच्या मृत्यूची संख्या ६६ हजार ४९१ वर जाऊन पोहचली आहे तर राज्यात बाधित रुग्णांचा आकडा ०८ लाख ०८ हजार ३०६ वर जाऊन पोहचला आहे तर राज्यात कोरोना बाधितांचा मृत्यू २४ हजार ९०३ वर जाऊन पोहचला आहे.

नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा २१ हजार ०९१ वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत २९८ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील १८ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत चार दिवसात अनेक प्रमुख मान्यवरांना आपले प्राण गमवावे लागले आहे. सलग प्रतिदिन मृत्यूची नोंद वाढत चालली आहे.आज आलेल्या यादीत शहरात ४४ तर ग्रामीण भागात १४ रुग्ण बाधित निघाले असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
आज आढळलेल्या बाधित रुग्णांत निवारा परिसर पाच पुरुष वय-५८,७४,६०,६२,६६ आदी आहे.सुभद्रानगर येथे दोन मुले वय-१७,१९) दोन महिला (वय-४०,३९) आणखी कोपरगाव नामोल्लेख करून परिसराचे नाव टाळले असून त्यात एक २५ वर्षीय युवक तर ४१ वर्षीय महिला,बालाजीअंगण युवक (वय-२६,महिला-५१) समतांनगर येथील एक पुरुष (वय-३६),लक्ष्मीनगर येथील चार पुरुष (वय अनुक्रमे-१७,८४,२१,२०) व अन्य तीन महिला (वय-६३,४५,७८) आदींचा समावेश आहे.बस स्थानक परिसर एक पुरुष (वय-४२),पांडे गल्ली एक युवक (वय-१७),बिरोबा चौक दोन महिला (वय-३३,४५),ब्राम्हण गल्ली एक महिला (वय-४८) रचना पार्क पुरुष (वय-४२),येवला रोड पुरुष (वय-३८),मोहिनीराज नगर येथील एक युवक (वय-२८),गांधीनगर दोन युवक (वय-२५,२७),टिळकनगर एक पुरुष (वय-५५) तर एक महिला (वय-२९),खडकी एक पुरुष (वय-२७),महिला (वय-२५),महादेवनगर येथील पुरुष (वय-२८),दोन महिला (वय-४२,२२),तेली गल्ली महिला (वय-४५),सुभाष नगर येथील एक पुरुष (वय-३४) तर महिला (वय-५५),दत्तनगर येथे एक पुरुष (वय-३८),भारत प्रेस रोड पुरुष (वय-४७) तर महिला (वय-४२),आदी ४४ नागरिकांचा समावेश आहे.
तर ग्रामीण भागात शहापुर येथे दोन पुरुष (वय-४२,१४),मुर्शतपूर येथे दोन पुरुष (वय-१३,४२),भोजडे येथे एक तरुण (वय-२८),कोळपेवाडी येथे एक पुरुष (वय-७०) तर दोन महिला वय-६५,२७),धारणगाव येथे एक महिला (वय-२९),बहादरपूर एक महिला (वय-३८),पोहेगाव येथे एक महिला (वय-२६),कोकमठाण एक पुरुष (वय-४२),शहाजापूर पुरुष (वय-२७),टाकळी येथे एक तरुण (वय-२५),आदी चौदा नागरिकांचा समावेश आहे.

दरम्यान आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ९२५ इतकी झाली आहे.त्यात १४६ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज एकाची वाढ होऊन आतापर्यंत १८ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.९५ टक्के आहे.आतापर्यंत ०४ हजार २३० जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला १६ हजार ९२० इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर २१.८६ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ७६१ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ८२.२७ टक्के झाला  आहे.दरम्यान या आकडेवारीमुळे नागरिकांत पुन्हा एकदा भीती निर्माण झाली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close