कोपरगाव तालुका
पत्रकार मंडलिक यांचे निधन
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जुन्या पिढीतील जेष्ठ पत्रकार व संपादक,मुद्रण व्यावसायिक संघाचे अध्यक्ष गजानन तुकाराम मंडलिक (वय-६५) यांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यांचा निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पच्छात पत्नी,दोन मुले,तीन मुली आदी परिवार आहे.
स्व.गजानन मंडलिक यांनी त्या काळी आपली गजानन प्रिंटिंग प्रेस सुरु करून जवळपास तीन दशके ती चालवली होती.ते सुवर्णकार समाजाचे जेष्ठ नेते म्हणूनही ओळखले जात.त्यांनी जेष्ठ पत्रकार स.म.कुलकर्णी अध्यक्ष असलेल्या कोपरगाव तालुका पत्रकार संघाचे ते आज पर्यंत विश्वस्त काम केले होते.
स्व.गजानन मंडलिक यांनी त्या काळी आपली गजानन प्रिंटिंग प्रेस सुरु करून जवळपास तीन दशके ती चालवली होती.ते लाड सुवर्णकार समाजाचे जेष्ठ नेते म्हणूनही ओळखले जात.त्यांनी जेष्ठ पत्रकार स.म.कुलकर्णी अध्यक्ष असलेल्या कोपरगाव तालुका पत्रकार संघाचे ते आज पर्यंत विश्वस्त होते.त्यांनी पांडे गल्ली तरुण मंडळ,कालभैरव तरुण मंडळाचे मार्गदर्शक म्हणूनही काम केले होते.त्यांच्या निधनाबद्दल नगराध्यक्ष विजय वहाडणे,जेष्ठ पत्रकार व पत्रकार संघाचे अध्यक्ष स.म.कुलकर्णी,साई संस्थांचे माजी विश्वस्त अशोक खांबेकर,नगर जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नानासाहेब जवरे,आदींनी दुःख व्यक्त केले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.