जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगाव तालुक्यात कोरोनाने माजी सरपंचाचे निधन

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्यात सलग चार दिवस कोरोना वाढीचा नवनवे उच्चांक गाठत असताना व आजपर्यंत १४ रुग्णांचे निधन झाले असताना आज पुन्हा एकदा कोरोनाने कहर केला असून कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच यमुनाबाई लक्ष्मणराव निखाडे (वय-६४) यांचे कोरोनाने निधन झाले असून त्यांच्यावर नगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.त्यांच्या पाच्छात दोन मुले,तीन मुली,नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कोरोना विषाणूने जगभर कहर उडवून दिला आहे.देशभरात आज ०७ हजार ०४१ रुग्णांची वाढ होऊन बाधित रुग्णांचा आकडा ३४ लाख ६८ हजार २७२ वर गेला आहे व कोरोना बाधित नागरिकांच्या मृत्यूची संख्या ६० हजार ७५० वर जाऊन पोहचली आहे तर राज्यात बाधित रुग्णांचा आकडा ०७ लाख ४७ हजार ९९५ वर जाऊन पोहचला आहे तर राज्यात कोरोना बाधितांचा मृत्यू २३ हजार ७७५ वर जाऊन पोहचला आहे.कोपरगावात निखाडे यांच्यासह आता मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या १६ झाली आहे.

स्व.यमुनाबाई निखाडे या कोकमठाण ग्रामपंचायतीच्या दि.२ सप्टेंबर २००० ते दि.१ सप्टेंबर २००५ या कालावधीत सरपंच होत्या.त्यांच्या काळात त्यांनी गावांसाठी अनेक विकास योजना राबविल्या असून त्यांना शुक्रवार दि.२१ ऑगष्ट रोजी अस्वस्थ वाटू लागल्याने त्याना आधी कोपरगाव येथील कोरोना केंद्रात तर नंतर नगर येथे सिव्हिल हॉस्पिटलला उपचारार्थ भरती करण्यात आले होते.मात्र त्याच्यावर उपचार आकरणाऱ्या ववैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यानां वाचविण्यात अपयश आले आहे.त्यांच्यावर नगर येथील वैकुंठधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांचे अन्य कुटुंबियही बाधित असल्याची माहिती प्राप्त झाली असून त्यांचे उपचारानंतर अखेरचे अहवाल निरंक आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.दरम्यान कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत एकूण चौदा रुग्ण कोरोना बाधित निघाले होते.त्यातील बहुतांशी आता निरंक झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close