जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात पथ विक्रेत्यांना कर्ज वितरण संपन्न

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राष्ट्रीय शहरी रोजगार अभियान भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी दारिद्य्र निर्मूलन मंत्रालयाने सुरु केलेल्या योजनेअंतर्गत मंजूर कर्जाचे आज कोपरगाव नगरपरिषदेच्या वतिने लाभार्थ्यांना कर्ज वाटप एक गाव एक गणपतीच्या आरती प्रसंगी बँक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे.हि योजना सरकारने २०१३ मध्ये सुरू केली असून पूर्वीच्या सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजने ऐवजी हि योजना सुरु केली आहे.

राष्ट्रीय शहरी रोजगार अभियान भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी दारिद्य्र निर्मूलन मंत्रालयाने,२३ सप्टेंबर २०१३ मध्ये सुरू केली असून पूर्वीच्या सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना ऐवजी हि योजना सुरु केली आहे.शहरी दारिद्रयाचे प्रमाण कमी करणे.शहरी गरीब कुटुंबातील व्यक्तींना कौशल्य विकास प्रशिक्षण देवुन रोजगाराची किंवा स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन त्यांच्यां राहणीमानाचा दर्जा उंचावणे,नागरी भागातील फेरीवाल्यांच्या उपजिविका सोडविण्याचे काम केले जाते.

राष्ट्रीय शहरी रोजगार अभियान भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी दारिद्य्र निर्मूलन मंत्रालयाने,२३ सप्टेंबर २०१३ मध्ये सुरू केली असून पूर्वीच्या सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना ऐवजी हि योजना सुरु केली आहे.शहरी दारिद्रयाचे प्रमाण कमी करणे.शहरी गरीब कुटुंबातील व्यक्तींना कौशल्य विकास प्रशिक्षण देवुन रोजगाराची किंवा स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन त्यांच्यां राहणीमानाचा दर्जा उंचावणे,नागरी भागातील फेरीवाल्यांच्या उपजिविका संबंधी समस्या सोडविण्याच्या दृष्टीने आवश्यक ती उपाययोजना करणे.त्याना घराची सोय करणे आदी कामे या योजनेद्वारे केली जात आहे.देशभर कोरोना विषाणूने थैमान घातल्याने अनेकांची रोजी-रोटी हिसकावली गेली आहे.त्यामुळे पथविक्रेते यांना आपला व्यवसाय सुरळीत ठेवण्यासाठी भांडवलाचा पतपुरवठा बँका मार्फत प्रदान करणेबाबत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत.शहरी फेरीवाला,पथविक्रेता यांना सूक्ष्म-पतपुरवठा करण्यासाठी पात्र लाभार्थींना बँकेमार्फत प्रती लाभार्थी रुपये १० हजार कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर प्रमाणे वितरीत झालेल्या कर्ज प्रस्तावांना ७% व्याज अनुदान लाभार्थीनी नियमित कर्जाची परत फेड केल्यास दर तिमाही व्याज अनुदानाचा लाभ मिळणार आहे.
या कामी व योजनेच्या अमलबजावणी नियंत्रणासाठी कोपरगांव शहर पातळीवर शासन निर्णयानुसार मुख्याधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. सदर समितीच्या मार्गदर्शनाखाली शहरातील पथविक्रेता सर्वेक्षण यादीतील लाभार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.

या प्रसंगी नगराध्यक्ष विजय वहाडणे,नगरसेवक कैलास जाधव,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,उपमुख्याधिकारी,मार्केट विभाग प्रमुख योगेश्वर खैरे,बांधकाम अभियंता,लेखापाल तुषार नालकर,विद्युत अभियंता रोहित सोनवणे,समाजकल्याण व माहिती जनसंपर्क पर्वेक्षक ज्ञानेश्वर चाकणे,राजेंद्र गाढे,चंद्रकांत साठे, जे-एन.यु.एल.एम.विभागाचे शहर अभियान व्यवस्थापक गालट,रामनाथ जाधव,मारुती काटे,निलेश बुचकुले,राजेंद्र शिंदे तसेच पंजाब नँशनल बँक व्यवस्थापक शंभू शंकर मुडी,रात्नेश सावनेर,बँक ऑफ इंडिया व्यवस्थापक डॉ.शितल मटकर,मोनाली पाटील,स्टेट बँक ऑफ इंडिया व्यवस्थापक बी.जे.रंजन प्रसाद आणि राजेंद्र साबळे,बँक ऑफ महाराष्ट्र व्यवस्थापक मनोरंजन मोहनती,अभिलेश वराडे आदी मान्यवर उपस्थित होते.

आज संपन्न झालेल्या कार्यक्रमात कोपरगाव शहरातील ४५१ पात्र लाभार्थ्यांपैकी ११६ प्रस्तावांना संबधित बँकानी ऑनलाईन पद्धतीने मंजुरी दिली होती. मंजूर प्रस्तावांपैकी आज २७ ऑगष्ट रोजी ७६ लाभार्थ्यांना प्रत्यक्षात प्रत्येकी रु.१० हजार रुपयां प्रमाणे कर्जाचे वितरण करण्यात आले आहे.
या निमित्ताने आज कोपरगांव उत्सव समिती आयोजित “एक गांव एक गणपती” सार्वजनिक गणेशोत्सव श्री ची रात्री ७.०० वा आरती बँकर्स यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात वेगवेगळा व्यवसाय करणाऱ्या १० लाभार्थ्यांना सामाजिक अंतराचे नियम पाळून कर्ज मंजुरी पत्रकाचे वितरण करण्यात आले.या प्रसंगी बोलतांना नगराध्यक्ष विजय वहाडणे व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी पी.एम.स्वनिधी योजनेचा उर्वरित लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close