जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात अकरा जणांचे स्राव तपासणी अहवाल आले

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या साथीने कहर केला असून काल दुपारी आलेल्या अहवालात एकूण ७३ अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून यात १८ रुग्ण बाधित आढळले असताना काल नगर येथे प्रयोग शाळेत तपासनीस पाठवलेल्या ११ श्रावांचे अहवाल आले असून त्यात दत्तनगर येथील ३४ वर्षीय पुरुष तर भामा नगर येथील ३४ वर्षीय पुरुष अशा दोघांचा समावेश असून अन्य ९ अहवाल निरंक आल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी आमच्या प्रातिनिधीस दिली आहे.

दरम्यान आता कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या यात ३३० इतकी झाली आहे.त्यात १८८ रुग्ण सक्रिय आहेत,तर आतापर्यंत ४ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.२१ टक्के आहे.आतापर्यंत १ हजार ९८९ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला ७ हजार ९१६ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर १६.५७ असा आढळला आहे

कोपरगाव तालुक्यातील पोहेगावात काल विक्रमी ८ रुग्ण आढळले होते त्या खालोखाल सोनारी व ब्राम्हणगाव येथे प्रत्येकी २ रुग्ण बाधित आढळले होते तर चांदेकसारे,येसगाव,टाकळी, येथे प्रत्येकी एक रुग्ण बाधित आढळला असून कोपरगाव शहरात जानकीविश्व व सुभद्रानगर येथे प्रत्येकी एक रुग्ण बाधित आढळल्याने कोपरगाव व तालुक्यात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण पसरले असताना आज सकाळी हे अहवाल प्रात झाले आहे.पोहेगावात वारंवार विक्रमी रुग्ण आढळत असल्याने काल पासून हे गाव पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

दरम्यान आता कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या यात ३३० इतकी झाली आहे.त्यात १८८ रुग्ण सक्रिय आहेत,तर आतापर्यंत ४ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.२१ टक्के आहे.आतापर्यंत १ हजार ९८९ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला ७ हजार ९१६ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर १६.५७ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या १३६ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ४१.४६ आढळला असल्याची माहितीही डॉ.फुलसुंदर यांनी शेवटी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close