जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात आढळले पुन्हा १८ बाधित रुग्ण !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या साथीने कहर केला असून आज दुपारी आलेल्या अहवालात एकूण ७३ अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून यात १८ रुग्ण बाधित आढळले असून यात पोहेगावात विक्रमी ८ रुग्ण आढळले असून त्या खालोखाल सोनारी व ब्राम्हणगाव येथे प्रत्येकी २ रुग्ण बाधित आढळले आहे तर चांदेकसारे,येसगाव,टाकळी, येथे प्रत्येकी एक रुग्ण बाधित आढळला असून कोपरगाव शहरात जानकीविश्व व सुभद्रानगर येथे प्रत्येकी एक रुग्ण बाधित आढळल्याने कोपरगाव व तालुक्यात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण पसरले आहे.पोहेगावात वारंवार विक्रमी रुग्ण आढळत असल्याने आज पासून हे गाव पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

दरम्यान पोहेगावमध्ये दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या लक्षणीय रित्या वाढत असल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींमुळे कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने तेथील व्यापाऱ्यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना म्हणून शनिवार दि.०८ ऑगष्ट ते बुधवार दि.१२ ऑगष्ट असे पाच दिवसापर्यंत अत्यावश्यक वैद्यकीय सेवासह गाव पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती हाती आली आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात दोन दिवसांपूर्वी ६५ कोरोना रुग्ण आढळण्याचा विक्रम स्थापित झाला असताना काल १९४ अँटीजन रॅपिड टेस्टसह नगर येथे पाठवलेले १६ अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात एक टाकळी फाटा येथील महिलेसह ३३ व्यक्ती बाधित निघाल्या असून अन्य त्यात २४ जणांचे अहवाल निरंक आले होते.तर काल अखेर २४ जणांना उपचारानंतर सोडून दिले आहे.बाधित रुग्णांत रवंदे येथे ७ तर पोहेगावात ४,जेऊर पाटोदा,टाकळी, कारवाडी,संजीवनी कारखाना प्रत्येकी ३,सोनारी येथे २ निवारा,कोळगाव थंडी,ब्राम्हणगाव,शिंगणापूर,येसगाव,चांदेकसारे,अंचलगाव प्रत्येकी १ असे रुग्ण बाधित आढळले होते.त्यानंतर आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास आलेल्या अहवालात एकूण ७३ अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून यात १८ रुग्ण बाधित आढळले असून यात पोहेगावात विक्रमी ८ रुग्ण आढळले असून त्यात ४०,१५,५०,२२,२४ वर्षीय पुरुष बाधित आढळले आहे.तर ३२,४०,६१ वर्षीय स्रिया बाधित आढळल्या आहेत. खालोखाल सोनारी येथे १६ वर्षीय मुलगा १८ व १२ वर्षीय मुली असे तीन रुग्ण बाधित आढळले आहे त्यात व ब्राम्हणगाव येथे ३५ व ७५ वर्षीय २ ग्रामस्थांनी मास्कचा वापर करावा व कोणत्याही कारणास्तव घराबाहेर पडू नये ही महिला रुग्ण बाधित आढळले आहे तर चांदेकसारे येथे ६० वर्षीय महिला,येसगाव येथे ६० वर्षीय महिला,टाकळी येथे ६५ वर्षीय महिला असे रुग्ण बाधित आढळले असून कोपरगाव शहरात जानकीविश्व येथे २७ वर्षीय युवक व सुभद्रानगर येथे ५९ वर्षीय पुरुष असे रुग्ण बाधित आढळले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यानी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

कोपरगाव तालुक्यातील पोहेगावात कोरोना रुग्ण आढळल्याने व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने ठेवलेला बंद छायाचित्रात दिसत आहे.

दरम्यान काल एक ८२ वर्षीय ब्राम्हणगाव येथील पुरुषाचे निधन झाल्याचे विश्वसनीय वृत्त आले आहे.त्यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान पोहेगावमध्ये दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या लक्षणीय रित्या वाढत असल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींमुळे कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने तेथील व्यापाऱ्यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना म्हणून शनिवार दि.०८ ऑगष्ट ते बुधवार दि.१२ ऑगष्ट असे पाच दिवसापर्यंत अत्यावश्यक वैद्यकीय सेवासह गाव पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती हाती आली आहे. बंद काळात कोणत्याही काराणास्तव दुकान सुरु असल्याचे आढळल्यास कायदेशीर दंडात्मक कार्यवाहीसह दुकान सील करण्याची कारवाई केली जाईल असा इशारा ग्रामपंचायतीने दिला आहे.मात्र सकाळी दूध संकलन करणारी केंद्रे मात्र सकाळी ९ वाजे पर्यंत व सायंकाळी ६ ते ८ वाजे पर्यंतच सुरु ठेवण्याचा अपवाद करण्यात आला आहे.या दरम्यानच्या बंद कालावधीत बाहेरील नागरिकांस गावात येण्यास तसेच गावातील व्यक्तीस गावाबाहेर जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.व नागरिकांना मुखपट्या वापरण्याचे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close