जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगाव तालुक्यात आणखी कोरोना बाधित रुग्ण

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात सुरेगाव व करंजीत कोरोना रुग्ण आढळल्यानंतर त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या संशयितांचे अहवाल येणे बाकी असतानाच आज दुपारी कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या शामवाडी परिसरात तीन दिवसांपूर्वी दि.१५ जुलै रोजी पुण्याहून आलेला इसम बाधित निघाल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.त्यामुळे आता कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीतही कोरोनाचा शिरकाव झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे.आता या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या घरातील चार व्यक्तींना आरोग्य विभागाने ताब्यात घेतले आहे व या भाग प्रतिबंधित करण्यात आला आहे.

दरम्यान आज या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या संशयित व्यक्तींना आरोग्य विभागाने ताब्यात घेण्यास प्रारंभ केला आहे.व त्यांची रवानगी कोपरगाव येथील विलगीकरण कक्षात केली आहे.व हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केला असल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी दिली आहे.

कोपरगाव शहरात ओमनगर येथील एक डॉक्टर व त्यांचे कुटुंब कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने शहर व तालुक्यात खळबळ उडाली होती त्यानंतर सुरेगाव व करंजी येथे पुन्हा दुसऱ्यांदा कोरोना बाधित रुग्ण निघाल्याने खळबळ उडाली होती.संबंधित रुग्ण उपचारासाठी ताब्यात घेतल्यानंतर सुरेंगावशी संबंधित अन्य वेळापूर येथील एक रुग्ण महिला बाधित निघाला होती.त्या नंतर करंजीतील अहवाल अद्याप प्रलंबित असताना आज कोकमठाण शिवारात शामवाडी येथील पुण्याहून आलेला एक रुग्ण बाधित निघाला आहे.

दरम्यान आज या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या संशयित व्यक्तींना आरोग्य विभागाने ताब्यात घेण्यास प्रारंभ केला आहे.व त्यांची रवानगी कोपरगाव येथील विलगीकरण कक्षात केली आहे.व हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केला असल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी दिली आहे.आता तालुक्यातील सुरेगाव येथील १७ व करंजी येथील १५ असे एकूण ३२ संशयित नागरिकांच्या अहवालाकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close