जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

रयतच्या उत्तर विभाग अध्यक्षपदी आ.काळे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

रयत शिक्षण संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिलची सभा नुकतीच सातारा येथे संस्थेचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आभासी बैठकीद्वारे नुकतीच पार पडली आहे. या सभेत रयत शिक्षण संस्थेच्या विविध विभागीय अध्यक्षांची निवड करण्यात आली असून उत्तर विभागीय अध्यक्षपदी कोपरगाव तालुक्याचे आ. आशुतोष काळे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

रयत शिक्षण संस्थेशी बांधिलकी ठेवून संस्थेच्या चेअरमनपदाची सलग पंधरा वर्ष जबाबदारी सांभाळून रयत शिक्षण संस्थेचा विस्तार वाढविण्यात माजी खा. शंकरराव काळे यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे.त्या नंतर माजी आ. अशोक काळे यांनी देखील रयत शिक्षण संस्थेसाठी सहकार्य केलेले आहे. काळे परिवाराचा हा वारसा आ.आशुतोष काळे यांनी पुढे चालवून रयत शिक्षण संस्थेची प्रगती करावी या उद्देशातून संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी हि जबाबदारी आ.काळे यांच्या खांद्यावर टाकली असल्याचे मानले जात आहे.ते उच्च शिक्षित असून मागील पाच वर्षात कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची जबाबदारी सांभाळत असतांना कारभार समाधानकारक करून दाखविला आहे.आ.आशुतोष काळे यांच्यावर खा.पवार यांनी उत्तर विभाग अध्यक्षपदी निवड करून त्यांना संधी दिली आहे.

यावेळी पार पडलेल्या सभेत इतरही चार विभाग अध्यक्षांची निवड करण्यात आली असून ती पुढीलप्रमाणे पश्चिम विभाग–अॅड. राम कांडगे,रायगड विभाग-आ. बाळाराम पाटील,मध्य विभाग-संजीव पाटील,दक्षिण विभाग-माधवराव मोहिते यांचा समावेश आहे. या बैठकीसाठी संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील,सचिव, सेक्रेटरी व सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य बहू संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close