जाहिरात-9423439946
अपघात

कोपरगाव तालुक्यात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारात मुंबई नागपुर राज्य मार्गावर रेल्वे पुलावर काल सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अवजड ट्रकने (क्रं.एम.एच.०४,ई.एल.८९९१) क्रं.एम.एच.२० एफ.एस.७९६१) समोरून येणाऱ्या दुचाकीस (क्रं.एम.एच.२० एफ.एस.७९६१) दिलेल्या धडकेत रोशन गफूर शेख (वय-२६) रा.टापरगाव ता.कन्नड जिल्हा औरंगाबाद या तरुणास जखमी करून फरार झाला आहे.त्यास उपचारास कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालायत भरती केले असता त्यास मयत घोषित केले आहे.

“आपण आपले सहकारी मयत रोशन शेख हे दि.०६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास आपले काम आटोपून घरी जात असताना समोरून येणाऱ्या वरील क्रंमाकाच्या ट्रकने त्यांना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून आपल्या ताब्यातील वाहन भरधाव चालवून समोरून येणाऱ्या दुचाकीस जोराची धडक देऊन त्यास गंभीर जखमी केले आहे.व त्यांस नजीकच्या नागरिकांनी कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालायत भरती केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यानी त्यास मृत घोषीत केले आहे.

सदरचे सवित्तर वृत्त असे की,फिर्यादी जाफर नजीर शेख (वय-२८) चालक रा.खंडाळा ता.वैजापूर यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करताना म्हटले आहे की,”आपण आपले सहकारी मयत रोशन शेख हे दि.०६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास आपले काम आटोपून घरी जात असताना समोरून येणाऱ्या वरील क्रंमाकाच्या ट्रकने त्यांना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून आपल्या ताब्यातील वाहन भरधाव चालवून समोरून येणाऱ्या दुचाकीस जोराची धडक देऊन त्यास गंभीर जखमी केले आहे.व त्यांस नजीकच्या नागरिकांनी कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालायत भरती केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यानी त्यास मृत घोषीत केले आहे.

या प्रकरणी फिर्यादी जाफर शेख यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी तातडीने पोलीस निरीक्षक देसले व पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांनी भेट दिली आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आरोपी ट्रक चालका विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.३०५/२०२१ भा.द.वि.कलम ३०४(अ),२७९,३३७,३३८,४२७,व मोटार वाहन कायदा कलम १३४(अ),(ब),१८४,१८७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी पुंड हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close