जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावातील..त्या संशयितांचे अहवाल प्राप्त

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात नुकतेच एकवीस जणांचे श्राव तपासणीसाठी आरोग्य विभागाने ताब्यात घेतले होते त्यांचे अहवाल आज दुपारी सव्वा दोनच्या सुमारास प्राप्त झाले असून त्या पैकी सतरा जणांचे अहवाल निरंक आले असून आधीचे चार व कालचे १९ असे जणांचे २३ अहवाल प्रलंबित असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा श्वास टाकला असला तरी अद्याप चार अहवाल काय असतील या बाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.दरम्यान

दरम्यान कोपरगाव शहरातील ओमनगर येथील रामनाथ कोंडाजी मेमाणे (वय-७२) व डॉ.अमरीश रामनाथ मेमाणे यांच्या विरुद्ध १९ जून व २३ जून रोजी वरील दोघा आरोपीनी कोपरगाव येथून नाशिक येथे जाऊन नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या जिल्हा बंदी आदेशाचे उल्लंघन करून शासकीय पास न घेता कोरोना विषाणूंचा संसर्ग करून मानवी जीवनास धोका निर्माण केल्याचा आरोप ठेवून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आता कोपरगाव तालुक्यात बाधित एकूण रुग्ण संख्या १३ झाली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहरात वर्तमानात कोणताही रुग्ण नसताना आता मंगळवार दि.१ जुलै रोजी धक्कादायक घटना उघड झाली असून कोपरगाव शहरातील खडकी रस्ता मार्गावर असलेल्या ओमनगर परिसरात असलेल्या एका खाजगी डॉक्टरला (वय-४५) व त्यांच्या वडिलांना (वय-७२) या दोघांना कोरोना विषाणूची बाधा झाली असून या खेरीज कोपरगाव तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायत हद्दीत धारणगाव ग्रामपंचायत हद्दीत मुंबईहून आलेल्या एका पाहुण्याला (वय-४६) कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली होती.त्यामुळे कोपरगाव शहर व तालुक्यात खळबळ उडाली होती.या तीनही कोरोना बाधित रुग्णांना तातडीने कोपरगाव कोरोना केंद्रातील विलगीकरण कक्षात हलविण्यात आले होते व हा परिसर तालुका प्रशासनाने प्रतिबंधित केला होता व त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य नागरिकांचा शोध सुरु केला होता.त्यात ओमनगर परिसरातील दोन रुग्णांच्या संपर्कात आलेल्या १२ संशयित व्यक्ती आढळल्या आहेत.या खेरीज टाकळी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या व धारणगाव रस्त्यालगत रहिवाशी असलेल्या मात्र मुंबई येथून आलेल्या रुग्णांच्या संपर्कात नऊ अशा एकवीस संशयित व्यक्ती आढळल्या आहेत.त्यांना तातडीने ताब्यात घेतले होते तर दुसऱ्या टप्प्यात १९ संशयित ताब्यात घेऊन त्यांची कोपरगाव येथील कोरोना केंद्रात संस्थात्मक विलगीकरण कक्षात रवानगी केली होती त्यांचे श्राव तपासणीसाठी नगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे तातडीने पाठवले गेले होते.

सदरचे अहवाल आज दुपारी २.१५ वाजेच्या सुमारास आले असून त्यात सतरा जण निरंक आले आहे.तर या कोरोना बाधित डॉक्टरच्या घरातील आई,बहीण व मुलगी बाधित आढळल्याने खळबळ उडाली होती.या आधी मुंबई येथून टाकळी येथे आलेल्या रुग्णांचा मुलगा तर दुसरा रुग्ण हा महिला असून येसगाव ग्रामपंचायत हद्दीतील मूळ रहिवाशी असून हा रुग्ण ओमनगर येथील डॉक्टरच्या परिचारिका असल्याची माहिती हाती आली आहे.दरम्यान या महिलेच्या मुलाला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असून त्याचे चार अहवाल प्रलंबित असून काल १९ जण ताब्यात घेतल्याने एकूण २३ जणांचे अहवाल प्रलंबित आहे.
दरम्यान कोपरगाव शहरातील ओमनगर येथील रामनाथ कोंडाजी मेमाणे (वय-७२) व डॉ.अमरीश रामनाथ मेमाणे यांच्या विरुद्ध १९ जून व २३ जून रोजी वरील दोघा आरोपीनी कोपरगाव येथून नाशिक येथे जाऊन नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या जिल्हा बंदी आदेशाचे उल्लंघन करून शासकीय पास न घेता कोरोना विषाणूंचा संसर्ग करून मानवी जीवनास धोका निर्माण केल्याचा आरोप ठेवून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु.ए.नं.२४४/२०२० भा.द.वि.कलम.१८८(२),२६९,२७१,३४ प्रमाणे गुन्हा फिर्यादि पो.कॉ.रामकृष्ण गोरख खारतोडे (वय-२९) दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.डी. आर.तिकोणे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close