आरोग्य
गुरुमाऊलीने व्याजदर कमी करण्याचे शिवधनुष्य पेलावे-आवाहन
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिक्षक बँक हि शिक्षकांची कामधेनू असून सत्ताधाऱ्यांनी सभासदांना न्याय द्यायचे सोडून सभासदांची दिशाभुल करायची व कर्ज व्याज दराच्या माध्यमातुन सभासदांचे शोषण करायचे. हा निषेधार्ह प्रकार गेल्या पाच वर्षापासुन प्राथमिक शिक्षक बँकेत चालु आहे.सदरचे शोषण थांबवुन कर्जाचा व्याजदर नऊ टक्के करा.अशी मागणी सदिच्छा मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर माळवे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे नुकतीच केली आहे.
सभासदांचे लक्ष या सर्वांपासुन विचलीत करण्यासाठी “गुरुमाऊली” मंडळातच मोठा तमाशा वारंवार उभा केला गेला,दोन गट पाडले,कधी कुणाचा प्रवेश तर कुणाची हकालपट्टी यात सभासदांना गुंतवुन बँकेवर राजरोजपांढरा दरोडा टाकण्याचे पाप गुरु माऊली मंडळाने केले आहे.कर्जाचा व्याजदर नऊ टक्के करा.व सभासदांचे शोषण थांबवा-माळवे
सन-२०१६ मध्ये शिक्षक बँकेत “गुरुमाऊली” मंडळाची सत्ता आली.दि. २२ फेब्रुवारी २०१६ रोजी ५०० रु.च्या स्टँपवर नोटरी करत कर्जाचा व्याजदर कमी ठेवु संचालक मिटींगा वर्षात १४च होतील व संचालक प्रवासभत्ता घेणार नाही असे जाहीर वचन गुरुमाऊली मंडळाने लिहुन दिले होते.सत्ता आल्यानंतर सर्व वचनांना हरताळ फासण्यात आला.संपुर्ण भारतामध्ये राष्ट्रियकृत बँका,नागरी सहकारी बँका,नोकरदारांच्या बँका यांचे कर्जाचे व्याजदर कमालीचे घसरले आहेत.मात्र नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची वसुली १०० टक्के असतांना,बँकेवर दुसर्या कोणत्याही बँकेचे कर्ज नाही,बँक स्वभांडवली असतांना सभासदांचे कर्जाच्या व्याजदरातुन प्रचंड शोषण चालवले आहे.सन-२०१६ मध्ये ११ टक्के,सन-२०१७ मध्ये ११ व १३% सन-२०१८ मध्ये १०.७५ सन-२०१९ मध्ये १०५० % व सन-२०२० मध्ये १०.३०% टक्के प्रमाणे वसुली करण्यात आली.कर्जाच्या व्याजदराच्या माध्यमातुन पठाणी वसुली करायची व नफा जादा झाल्याचा डांगोरा पिटवायचा.मात्र जादा नफ्याचा सभासदांना फायदा न देता,कर्मचार्याचे वेतन भत्ते,विविध खरेदी,शताब्दी वर्ष,घड्याळ खरेदी,नेवासा व इतर शाखा दुरुस्त्या,फर्निचर,प्रवास भत्ते या वा इतर अनेक माध्यमातुन संचालकांनी स्वतःचे खिसे भरायचे हाच कार्यक्रम गेल्या पाच वर्षापासुन सातत्याने चालु आहे.
सभासदांचे लक्ष या सर्वांपासुन विचलीत करण्यासाठी “गुरुमाऊली” मंडळातच मोठा तमाशा वारंवार उभा केला गेला,दोन गट पाडले,कधी कुणाचा प्रवेश तर कुणाची हकालपट्टी यात सभासदांना गुंतवुन बँकेवर राजरोजपांढरा दरोडा टाकण्याचे पाप गुरु माऊली मंडळाने केले आहे.कर्जाचा व्याजदर नऊ टक्के करा.व सभासदांचे शोषण थांबवा अशी विनंती सर्वश्री माळवेंसह,गहिनीनाथ शिरसाठ,बाळकृष्ण डमाळ,राजाभाऊ बेहेळे,चंदु मोढवे,राजेंद्र बनकर,अशोक गव्हाणे,सुनिल सोळसे,संतोष भोंडवे,अशोक गडाख,अशोक पथवे,शंकर गाडेकर,गहीनिनाथ पिंपळे आदींनी केली आहे.गुरुमाऊलीने घरातील संघर्ष घरातच मिटवुन सभासदांचे शोषण थांबवा.जिल्ह्यातील सभासद सुज्ञ असुन येत्या निवडणुकीत गुरुमाऊलीच्या दोन्ही गटांना घरचा रस्ता दाखवतील असा इशारा राजेंद्र शिंदे व रविंद्र पिंपळे यांनी दिला आहे.