जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात..त्या आरोपीला दोन दिवसाची कोठडी !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहराच्या उत्तरेस असलेल्या नगर-मनमाड मार्गावरील साई धाम आश्रमाच्या कमानीसमोर पाटोदा ता.येवला येथील आरोपी नामदेव रामदास बोरणारे हा रात्री नऊच्या सुमारास आपली मारुती एस.एक्स-४ हि कार उभी करून स्वतःच्या ताब्यातील अवैध शस्र तथा पिस्तूल विक्री करण्यासाठी थांबलेला असताना त्यास कोपरगाव शहर पोलिसानी अटक केली होती त्यास आज दुपारी तिनच्या सुमारास शहर पोलिसानी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री डोईफोडे यांच्या समोर हजर केले असता दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

कोपरगाव तालुक्याच्या उत्तरेस चार की.मी.अंतरावर असलेल्या नगर-मनमाड राज्यमार्गावर साईधाम कमानीजवळ पाटोदा ता.येवला येथील आरोपी नामदेव रामदास बोरणारे (वय-४३) हा आपल्या मारुती एस.एक्स.४ (क्रं.एम.एच.४३ ए. जे.२७०९) या गाडीत बसून आपल्याजवळ अवैध गावठी पिस्तूल बाळगून असल्याची गुप्त बातमी कोपरगाव शहर पोलिसानां मिळाली होती त्यांनी या नंतर टाकलेल्या धाडीत या आरोपी जवळील विक्रीसाठी असलेले एक पिस्तूल,एक मॅगझीन,जिवंत काडतुस,एक एम.आय.कंपनीचा भ्रमणध्वनी असा ५ लाख ३६ हजार २०० रुपयांचा ऐवजासह आरोपी जेरबंद केला होता.

कोपरगाव तालुक्याच्या उत्तरेस चार की.मी.अंतरावर असलेल्या नगर-मनमाड राज्यमार्गावर साईधाम कमानीजवळ पाटोदा ता.येवला येथील आरोपी नामदेव रामदास बोरणारे (वय-४३) हा आपल्या मारुती एस.एक्स.४ (क्रं.एम.एच.४३ ए. जे.२७०९) या गाडीत बसून आपल्याजवळ अवैध गावठी पिस्तूल बाळगून असल्याची गुप्त बातमी कोपरगाव शहर पोलिसानां मिळाली होती त्यांनी या नंतर टाकलेल्या धाडीत या आरोपी जवळील विक्रीसाठी असलेले एक पिस्तूल,एक मॅगझीन,जिवंत काडतुस,एक एम.आय.कंपनीचा भ्रमणध्वनी असा ५ लाख ३६ हजार २०० रुपयांचा ऐवजासह आरोपी जेरबंद केला होता.त्यामुळे कोपरगाव,येवला परिसरात खळबळ उडाली होती.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसानी या आरोपी विरुद्ध गु.र.नं.२४५/२०२०,आर्म ऍक्ट ३/२५,७ प्रमाणे आरोपी नामदेव बोरणारे याचे विरुद्ध शनिवार दि.४ जुलै रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला होता.आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास कोपरगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री.डोईफोडे यांचे समोर आरोपी नामदेव बोरणारे यास हजर केले असता न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद एकूण घेतला व आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.दरम्यान अवैध शस्र विक्री करणाऱ्या गुन्हेगारात या घटनेने खळबळ उडाली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे हे करित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close