कोपरगाव तालुका
विशिष्ट मतांसाठी ‘द केरला स्टोरीवर आक्षेप-…या नेत्यांचा दावा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
‘द केरला स्टोरी’च्यानिमित्ताने संपूर्ण देशात संतापाची व जागृतीची लाट उसळलेली असतांना काही मतांसाठी लाचारी पत्करणाऱ्या नेत्यांनी मात्र गठ्ठा मतदारांना खुश करण्यासाठी या सिनेमावरच आक्षेप घेतलेला दिसत असून त्यांना देशात सुरु असलेले ‘धर्मांतरण’ व ‘लव्ह जिहाद’चा नंगानाच दिसत नसल्याची टीका आहे कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष विजय वहाडणे यांनी नुकतीच एका प्रसिद्धी पत्रकांव्ये केली आहे.
“निवडणुका व मते डोळ्यासमोर ठेवून झोपेचे सोंग घेणाऱ्या राजकारण्यांनीं-कोपरगाव शहरातील निंबारा मैदान येथील एका हिंदु युवकाचे धर्मांतरण केल्याने तो आता इस्लाम धर्म स्वीकारून कट्टर मुस्लिम म्हणून वावरतांना दिसतो असा दावा करून त्यांनी कोपरगावात वर्षानुवर्षे राहणाऱ्या प्रामाणिक मुस्लिम परिवारांबद्दल कुणाचे काहीच दुमत नाही.पण बाहेरून येऊन शहरात धर्मांतर व लव्ह जिहादचे चाळे करणाऱ्या काही विघातक शक्तींमुळे संपूर्ण शहरातील सामाजिक स्वास्थ्य बिघडू शकते”-विजय वहाडणे,माजी अध्यक्ष,कोपरगाव नगर परिषद.
त्यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की,”कोपरगाव शहरात तर ‘लव्ह जिहाद’चे संकट अनेक हिंदु कुटुंबावर कोसळलेले आहे.त्या कुटुंबांना राष्ट्रीय स्वयंसेवक व संघ परिवारानेच आधार द्यायचा सातत्याने प्रयत्न चालविलेला आहे.राजकीय नेते मात्र याबाबत कुठलीही प्रतिक्रिया देत नाहीत.’द केरला स्टोरी’ तील शालिनी हे पात्र काल्पनिक नसून केरळमधील चिंताजनक-संतापजनक सत्य घटना असल्याचा त्यांनी दावा केला आहे.राजकीय नेत्यांनी व सर्वांनीच हे लक्षात घ्यावे कि,”आपल्यालाही आई-बहिण-पत्नी-मुलगी आहे.आपण जागृत राहिलो नाही तर आपल्यापैकी कुणाच्याही घरावर ‘धर्मांतर’ व ‘लव्ह जिहाद’चा नांगर चालून येऊ शकतो.त्यावेळी ओरडत बसण्याशिवाय आपल्या हातात काहीच नसेल.केरळ मधील हजारो मुली पळवून-धर्मांतर करून-बलात्कार करून इस्लामी देशात विकल्या गेल्या,इतकेच नव्हे तर काहींना दहशतवादी संघटनेत काम करण्यास भाग पाडण्यात आले.
निवडणुका व मते डोळ्यासमोर ठेवून झोपेचे सोंग घेणाऱ्या राजकारण्यांनीं-कोपरगाव शहरातील निंबारा मैदान येथील एका हिंदु युवकाचे धर्मांतरण केल्याने तो आता इस्लाम धर्म स्वीकारून कट्टर मुस्लिम म्हणून वावरतांना दिसतो असा दावा करून त्यांनी कोपरगावात वर्षानुवर्षे राहणाऱ्या कष्टकरी-प्रामाणिक मुस्लिम परिवारांबद्दल कुणाचे काहीच दुमत नाही.पण बाहेरून येऊन शहरात धर्मांतर व लव्ह जिहादचे चाळे करणाऱ्या काही विघातक शक्तींमुळे संपूर्ण शहरातील सामाजिक स्वास्थ्य बिघडू शकते याचे भान ठेवणे गरजेचे आहे.जोपर्यंत आपल्या घरावर असे संकट येत नाही तोपर्यंत मूग गिळून बसण्याचा नादानपणा नेत्यांनी-कार्यकर्त्यांनी करू नये अशी अपेक्षा त्यानीं व्यक्त केली आहे.महिला-भगिनी ती कुठल्याही जाती धर्माची असो,तिच्याबाबत गैरप्रकार-अन्याय-अत्याचार आपण सहन करता कामा नये.मतांचे गठ्ठे मिळवून कदाचित एखादे पद प्राप्त होईल,पण आपला परिवार-समाज-धर्म-शहर
आणि भावी पिढी संकटात आल्याशिवाय रहाणार नाही.विशेषतः चोवीस तास राजकारण करणाऱ्यांनी आपल्या वर्तनात बदल केला पाहिजे.या विषयाकडे राजकारण म्हणून न बघता हे आपल्याच घरातील भगिनींवर आलेले संकट मानले पाहिजे.जे जे समजदार मुस्लिम आहेत त्यांनीही चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्यांवर अंकुश ठेवणे गरजेचे आहे.कदाचित माझ्या या बातमीमुळे काही कुटिल राजकारणी मुस्लिमांमध्ये गैरसमज पसरविण्याचे उद्योग करतीलही.पण हिंदू असो की मुस्लिम कुठल्याही महिलेवर अन्याय झाल्यास तिला मदत करणे आपले कर्तव्य आहे असेच आपण मानत असल्याचा त्यांनी दावा करून राजकारण महत्वाचे नसून आपल्या शहरातील सर्वांचेच एकमेकांशी सलोख्याचे संबध असणे महत्वाचे असल्याचा दावा त्यांनी शेवटी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केला आहे.