जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

माहेराहून दुचाकीसाठी महिलेचा छळ-कोपरगावात पाच जणांवर गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

आपल्या माहेराहून दुचाकी खरेदीसाठी १ लाख रूपयांची रक्कम आणण्यासाठी विवाहित महिलेचा शिवीगाळ करून छळ केला असून आजार पणासाठी सदर महिला माहेरी आली असताना दुसरे लग्न लावून दिल्या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपी संतोष शरद माळी अनिता माळी यांचेसह पाच जणांवर फिर्यादी महिला शीतल संतोष माळी हिने गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादीच्या लग्नानंतर सासरची मंडळीनीं काही महिन्यातच आपली लीला दाखविण्यास सुरुवात केली होती.फिर्यादी महिलेने आपल्या माहेराहून दुचाकी खरेदी करण्यासाठी रुपये १ लाख आणावे यासाठी नवरा संतोष माळी फिर्यादी महिलेची नणंद अनिता शरद माळी,सासरे शरद जयराम माळी,भाऊ जालिंदर शरद माळी आदींनी त्रास देण्यास सुरुवात केली होती.त्यातून हा प्रकार झाला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी महिला शीतल संतोष माळी हिचे कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील रहिवासी आहे.तिचे लग्न हंडेवाडी येथील तरुण संतोष माळी यांचेशी १४ मे रोजी लग्न लावून दिले होते.त्यानंतर नव्या लावलाईचे काही दिवस सुखात गेले होते.त्या नंतर सासरची मंडळी आपली लीला दाखविण्यास सुरुवात केली होती.फिर्यादी महिलेने आपल्या माहेराहून दुचाकी खरेदी करण्यासाठी रुपये १ लाख आणावे यासाठी नवरा संतोष माळी फिर्यादी महिलेची नणंद अनिता शरद माळी,सासरे शरद जयराम माळी,भाऊ जालिंदर शरद माळी आदींनी त्रास देण्यास सुरुवात केली होती.त्यात सदर फिर्यादी महिलेला शिवीगाळ करून मारहाण करून छळ सुरु केला होता.फिर्यादी महिला अनिता हि उपचार घेणेसाठी दि.२१ ऑगष्ट रोजी आपल्या माहेरी आली होती.तीच संधी साधून आरोपिनीं लग्नाचे कुभांड रचले होते.

सदर महिला आजारी असल्याने माहेरी उपचारासाठी आली असता आरोपी नणंद अनिता माळी व दिर जालिंदर माळी यांनी फिर्यादी महिलेच्या नवऱ्याचे पहिले लग्न झाले असताना देखील पाचवी आरोपी महिला व दुसरी पत्नी रेखा भाऊसाहेब पवार हिच्याशी लग्न लावून दिले आहे.
त्यामुळे फिर्यादी महिलेने त्या विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.३४४/२०२२ भा.द.वि.कलम ४९८(अ),४९४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे पाचही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सदर घटनास्थळी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,पो.हे.कॉ.सुरेश बोटे यांनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव यांचे मार्गदर्शना खाली पो.हे.कॉ.बोटे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close