जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

स्वातंत्र्याचा,’अमृत महोत्सव’ कोपरगावात प्रभात फेरी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

श्रीमान गोकुळचंद विदयालयाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं,’हर घर तिरंगा’अंतर्गत कोपरगांव शहरातील मुख्य मार्गवरुन प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.

कोपरगावातील या प्रभात फेरी मध्ये हर घर तिरंगा,’भारत माता की जय’,’वंदे मातरम’,आदी घोषणानी वातावरण देशभक्तीमय झाले होते.श्रीमान गोकुळचंदजी विदयालयातुन निघालेली प्रभात फेरी गांधी चौक,शिवाजी रोड,सराफ बाजार,कापड बाजार,धत्रपती शिवाजी महाराज चौक,अहींसा चौक पुढे तहसिल कचेरी समोरुन,डाॕ.गर्जे हाॕस्पीस्टल ते परत विदयालयात समारोप झाला आहे.

या प्रभात फेरीमध्ये विदयालयांतील स्काउट गाईड पथक,एन.सी.सी.पथक यांच्या समवेत लेझीम पथक,लाठी काठी पथक सहभागी झाले होते.या पथकातील विदयार्थीनी शहराच्या मुख्य ठीकाणी लेझीम,लाठी काठीची प्रात्यक्षिके तसेच देशभक्तीपर समुहनृत्य सादर करुन शहरातील वातावरण देशभक्तीमय करण्याचा प्रयत्न केला आहे.या शहरातील नागरीकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

सदर प्रसंगी कोपरगांवचे तहसिलदार विजय बोरुडे,कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,चेअरमन चंद्रकांत ठोळे,सचिव दीलीपकुमार अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे,जेष्ठ नागरीक मंचच्या सुधाभाभी ठोळे,स्वच्छता दुत व श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास संख्यानचे सुशांत घोडके,राजेंद्र कपोते,सुनिल फंड,महावीर शिंगी,डाॕ.अजेय गर्जेआदी सहभागी झाले होते.

सदर समारोप प्रसंगी मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी शहीद झालेल्या क्रांतिकारकाची माहीती दीली.अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्वाचे अभिनंदन केले आहे.दरम्यान या प्रभात फेरीमध्ये विदयालयातील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी सहभागी झाले होते.

सदर कार्यक्रमाचे विद्यालयाचे उपमुख्याध्यापक आर.बी.गायकवाड यांनी प्रास्ताविक केले तर पर्यवेक्षक यु.एस.रायतेमॕडम यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close