धार्मिक
कोपरगाव नजीक गोदावरीत…या महंतांचे गंगास्नान

न्यूजसेवा
संवत्सर (वार्ताहर)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे गोदावरी काठावर जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख महंत रमेशगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत श्रावण पर्वणी व गंगास्नानाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला आहे.त्यात अनेक भाविकांनी सहभाग नोंदवला आहे.
गोदावरी सर्व नद्यांमध्ये ही प्राचीन व श्रेष्ठ असून,तिच्या केवळ स्मरणाने सर्व पापांचा नाश होतो असे म्हटले जाते.प्रभू रामचंद्रांनी पंचवटीच्या वास्तव्यात तिच्या तीरावर पितृश्राद्ध घातले.सिंहस्थ पर्वणीत स्नान हे विशेष पुण्यदायक असल्याचे ब्रह्मांड पुराणात म्हटले आहे.सिंहस्थ काळात साधू महंत गोदावरीत स्नान करीत असल्याने त्यांनी वर्षोंवर्ष केलेल्या तपाची ऊर्जा या पाण्यात उतरते अन् म्हणूनच याकाळात गोदावरीत स्नान केल्याने सकारात्मक व आध्यात्मिक ऊर्जा आपल्याला मिळते असे म्हटले जाते.त्यामुळे महंत रमेशगिरीजी यांच्या सोबत गंगा स्नान करण्यात औचित्य असल्याचे मानले जाते.
आज सकाळी नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून सालाबादप्रमाणे संवत्सर येथे गांदावरी काठावर श्री शृंगेश्वर मंदिराशेजारी श्रावणी पर्व व गंगास्नासाठी संवत्सर,दहेगांव,तिळवणी,शिरसगांव, आपेगांव,वारी,कान्हेगांव,येसगांव,पढेगांव,कोपरगांव,शिर्डी येथील अनेक भावकि भक्त श्रावण पर्वणी साधण्यासाठी दरवर्षीप्रमाणे संवत्सर येथे गोदाकाठी जमून महंत रमेशगिरी महाराज यांच्या समवेत गंगास्नानाची पर्वणी सथली.सदर प्रसंगी महंत रमेगिरी महाराज यांना सर्वच भाविक भक्तांनी तूप.दही,लोणी,शेण व गोमुत्राच्या मिश्रणाने गंगास्नान घातले आहे.
यावेळी गंगेचा जयघोष करण्यात आला.याप्रसंगी अनेक भाविक भक्तांनी गंगंत स्नान करुन गंगेला साडी चोळी अर्पण करुन गंगाआरती केली आहे.प्रत्येक भाविकांनी वयोमानानुचार परस्परांना स्नान घातले.त्यानंतर महंतांनी गंगेला साडी-चोळी अर्पण करुन गंगेची मनोभावे पूजा व आरती केली.
या प्रसंगी पुरोहीतांनी मंत्रजपाचा जयघोष केला यानंतर महंतांना वस्त्र दान करण्यात आले. याप्रसंगी महंत रमेशगिरी महाराज म्हणाले,”श्रावण पर्वणी भारतामध्ये संवत्सरचे महत्व अनन्यसाधारण आहे.राम जन्मासाठी शृंगेश्वर ऋषींना संवत्सर येथूनच पाचारण करण्यात आले होते.तसेच या ठिकाणी ही भूमी पावन असून याच ठिकाणी देवादिकांचे युध्दही झालेले होते.ते युध्द्ध गेली आठ ते वर्षो पाठिमागे चालू होते.या परिसराला मोठी परंपरा आहे.या परिसरात अनेक संत महंतांचे वास्तव्य आहे.या प्रसंगी संवत्सर येथील काका गायकवाड,शिवाजी गायकवाड,धिरज देवतरसे,ज्ञानेश्वर कासार,निवृत्ती लोखंडे,चंद्रकांत लोखंडे,बाबुराव मैंद,सुभाष लोखंडे,आरोठा आधारी,यांनी सर्व महंतांची फलाहार,पुष्पे देऊन पूजन केले.
सदर प्रसंगी गंगास्नानाला संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीन कोल्हे,शिंगणापूरचे सरपंच भिमा संवत्सरकर,अशोक काजळे,राजेंद्र काजळे,सतीश काळे व पंचक्रोशीतील महिलांसह भावीक भक्त उपस्थित होते.