जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
नैसर्गिक आपत्ती

खरीप अतिवृष्टीची नुकसान भरपाई तातडीने द्या-…या नेत्याची मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

अतिवृष्टीमुळे खरीप हंगामांतील ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले त्याचे पंचनामे देखील महसूल,कृषी विभागाकडून करण्यात आले मात्र त्याची नुकसान भरपाई मिळाली नाही ती तातडीने द्यावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे नुकतीच केली आहे.

“कोपरगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात जवळपास ३४००० हेक्टर क्षेत्राचे ४६६९४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.यापैकी ऑगस्ट २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीचे १.३१ कोटी मिळाले आहेत.परंतु सप्टेंबर २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीचे २७.३५ कोटी व सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे ५३.९७ कोटी असे एकूण जवळपास ८१.३२ कोटी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

कोपरगाव मतदार संघात खरीप हंगाम २०२२ मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीन,मका,कापूस,बाजरी आदी खरीप पिकांचे तसेच कांदा रोप,भाजी पाला व चारा पिकांचे मोठे नुकसान होवून शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला होता.अनेक ठिकाणी तर शेतांना तळ्याचे स्वरूप आले होते या नैसर्गिक संकटामुळे अडचणीत असलेला शेतकरी अजूनच अडचणीत आला होता.झालेल्या नुकसानीचे पंचनाम्याचे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर नुकसान भरपाई अनुदान मिळेल या आशेवर बसलेला नुकसानग्रस्त शेतकरी आजही अनुदानापासून वंचित आहे.अनेक शेतकऱ्यांनी पिक विमा देखील भरलेले आहेत मात्र पिक विमा कंपन्यांनी देखील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करून शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे.

कोपरगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात जवळपास ३४००० हेक्टर क्षेत्राचे ४६६९४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.यापैकी ऑगस्ट २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीचे १.३१ कोटी मिळाले आहेत.परंतु सप्टेंबर २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीचे २७.३५ कोटी व सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे ५३.९७ कोटी असे एकूण जवळपास ८१.३२ कोटी अनुदानाच्या प्रतीक्षेत हजारो शेतकरी आहेत.सध्या रब्बी हंगामाची तयारी सुरु असून शेतकरी आर्थिक अडचणीत आहे.

कोपरगाव तालुक्यातील या शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानाची रक्कम मिळाल्यास शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी काही प्रमाणात दूर होणार आहेत.त्यामुळे तातडीने अतिवृष्टीचे अनुदान द्यावे अशी मागणी आ.काळे यांनी केली आहे.सदर निवेदनाच्या प्रति त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचेकडे पाठवल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close