जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव साठवण तलावास अखेर कार्यारंभ आदेश

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगांव शहराच्या १३१.२४ कोटींच्या मंजुर असलेल्या पाणी योजनेचे काम सुरु करण्याच्या प्रक्रियेबाबत कार्यारंभ आदेश मिळाला असून आगामी दोन वर्षात काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी आभासी पत्रकार परिषदेत नुकतीच दिली आहे.त्यामुळे शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

“कोपरगाव येथील साठवण तलावासाठी सरकारने १३१.२४ कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी मिळून तीन महिने उलटले होते.शासकीय कार्यादेशानुसार योजना मंजुर झाल्याच्या दिवसापासून ९१ व्या दिवसांच्या आत हे काम प्रत्यक्ष सुरु करणे बंधनकारक केलेले असताना याबाबत शहरात अस्वस्थता पसरली होती.मात्र आता त्यावर तोडगा निघाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

कोपरगाव शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या साठवण तलाव क्रमांक ५ साठी ‘महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत १३१.२४ कोटी रुपये खर्चाला दि.२५ मार्च २०२२ रोजी आ.आशुतोष काळे व स्थानिक कार्यकर्ते संजय काळे,राजेश मंटाला आदींनी प्रयत्न करून आर्थिक मान्यता राज्याच्या नगरविकास मंत्रालयाने दिली होती.त्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते.मात्र या योजनेला मंजुरी मिळून तीन महिने उलटून गेले होते.सदर कामाची निविदा प्रसिद्ध होऊन त्यासाठी काम सुरु करण्यासाठी एक सप्ताहाचा अवधी जीवन प्राधिकरण विभागाने दिला होता.मात्र त्यास तीन महिने उलटूनही अद्यापही कुठलीही कार्यवाही दिसत नाही.त्यामुळे नगरपरिषद हद्दीत उलटसुलट चर्चा सुरू झाली होती.मात्र आज आ.आशुतोष काळे यांनी आभासी पत्रकार परिषद आयोजित करून कार्यारंभ आदेश दिल्याने व आगामी दोन वर्षात सदर काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

सदर प्रसंगी कोपरगाव शहर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,नगरपरिषदेचे माजी गटनेते विरेंन बोरावके,माजी नगरसेवक रमेश गवळी,कृष्णा आढाव,राजेंद्र वाकचौरे,धरम शेठ बागरेचा,अड.विद्यासागर शिंदे,नवाज कुरेशी,मंदार पहाडे,अजीज शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर प्रसंगी हे काम लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनीस देण्यात आले असल्याची माहिती दिली असून हे काम निर्धारित वेळेच्या आधी पूर्ण करून आपण शहरातील नागरिकांना प्रत्येक दिवशी पाणी देऊ असे आश्वसित केले आहे.

त्यामुळे उपस्थित राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून व आ.काळे यांच्या नावाच्या घोषणा देऊन स्वागत केले आहे.

दरम्यान मध्यनंतरी राजेश मंटाला व त्यांच्या सहकाऱ्यांनी याबाबत म्हटले होते की,”योजनेच्या शासकीय कार्यादेशानुसार योजना मंजुर झाल्याच्या दिवसापासून ९१ व्या दिवसांच्या आत हे काम प्रत्यक्ष सुरु करणे बंधनकारक केलेले आहे तसेच या कालमर्यादेचे पालन पालिकेचे मुख्याधिकारी यांनी करण्याचे स्पष्ट आदेश त्यात शासनाने दिलेले आहेत.२४ जुन २०२२ रोजी ९१ दिवस पुर्ण झालेले आहेत तरी देखिल प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली नाही.मुख्याधिकारी गोसावी यांना याबाबत जाब विचारण्यात आला होता.मात्र हा प्रश्न मार्गी लागला असल्याचे मानले जात आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close