जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

नैसर्गिक संकटे आली तरी शेतकरी शेती करणे सोडत नाही- डख

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

भारत देश हा मुळातच कृषीप्रधान देश आहे.देशाची निम्म्याहून अधिक अर्थव्यवस्था शेतीवरच अवलंबून आहे. कोणत्याही मार्गाने नैसर्गिक संकटे आली तरी, शेतकरी शेती करणे सोडत नाही. जगातले सगळे उद्योग बंद पडतील परंतु शेती आणी वैद्यकीय हे दोन उद्योग मात्र कधीच बंद होऊ शकत नसल्याचे प्रतिपादन प्रसिध्द हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांनी संवत्सर येथील कार्यक्रातून केले.

“अलिकडच्या काही वर्षात पर्यावरणाचे असंतुलन मोठ्या प्रमाणावर वाढल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलेला आहे.शेतीचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी निसर्गाच्या लहरीपणाचा अंदाज घेऊनच आपली शेती करावी”-पंजाबराव डंख,हवामान तज्ज्ञ.गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका सहकारी दूध संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेवराव परजणे पाटील यांच्या अठराव्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त संवत्सर येथे आयोजित कार्यक्रमात ” शेती काल, आज आणि उद्या “या विषयावर ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे या अध्यक्षस्थानी होत्या.

   सदर प्रसंगी पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे,गोदावरी दूध संघाचे संचालक राजेंद्रबापू जाधव,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरदराव नवले,गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,अॅड.अशोक म्हस्के,कृषी अधिकारी पंडितराव वाघिरे,सरपंच सुलोचना ढेपले यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी स्व.परजणे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

अलिकडच्या काही वर्षात पर्यावरणाचे असंतुलन मोठ्या प्रमाणावर वाढल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलेला आहे.शेतीचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी निसर्गाच्या लहरीपणाचा अंदाज घेऊनच आपली शेती करावी असे सांगून डख पुढे म्हणाले,”मागील दोन अडीच वर्षापूर्वी कोरोनाच्या काळात अनेकांना ऑक्सिजनअभावी आपला जीव गमवावा लागला.ऑक्सिजन किती महत्वाचा आहे हे कोरोनाने आपल्या निदर्शनास आणून दिले आहे.पृथ्वीवरील विविध नैसर्गिक घटकांना देखील ऑक्सिजनची गरज लागते.तो  वेगवेगळ्या झाडांमधून पृथ्वीला मिळत असतो. परंतु अलिकडच्या दोन दशकात प्रचंड प्रमाणात वृक्षतोड झाल्याने ऑक्सिजनचे प्रमाण अतिशय कमी होत गेले. परिणामी जमिनीच्या तापमानात वाढ झाल्याने पावसाचे प्रमाणही असंतुलीत झाले आहे. कुठे काहीच नाही तर,काही ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. यात शेतीचे प्रचंड नुकसान होण्याचे प्रमाण वाढले आहे.

समुद्रपातळीवरच्या बदलापासून ते पृथ्वीवरील जीवसृष्टी विलुप्त होण्यामागे हवामानाचे क्षणाक्षणाला होणारे बदल कारणीभूत आहेत. त्याचा मानवी जीवनावरही विपरीत परिणाम होत आहे. भविष्यातले हे नुकसान टाळण्यासाठी वृक्षारोपणाची मोहीम सर्वत्र राबविणे गरजेचे आहे असे सांगून श्री डख यांनी यंदाचे हवामान कसे असेल ? पाऊस कसा व कधी पडेल ? शेतकऱ्यांनी खरीप व रब्बी हंगामाची पेरणी कधी व कशी करावी ? कोणत्या भागात कधी पाऊस पडेल? या शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे देऊन मार्गदर्शन केले.

यावेळीशालिन विखे यांनीही मार्गदर्शन केले. संवत्सर येथील नामदेवराव परजणे महाविद्यालय व कोपरगांव येथील महिला महाविद्यालयातील गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश वितरीत करण्यात आले.कार्यक्रमास नानासाहेब सिनगर, सुभाषराव होन,विजयराव जाधव,निवृत्ती नवले, भाऊसाहेब काळे,अजयराव आव्हाड,सुदाम शिंदे, गोरखनाथ शिंदे,लक्ष्मणराव साबळे,खंडू फेपाळे, लक्ष्मणराव परजणे, चंद्रकांत लोखंडे, सोमनाथ निरगुडे, अनिल सोनवणे, बाबासाहेब फटांगरे, विकास आढाव, अजित कोरके, भास्करराव डुकळे, डॉ.दिलीप दहे,भाऊसाहेब कदम,दत्तात्रय शितोळे यांच्यासह शेतकरी,विविध संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक, प्राध्यापक,विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थितांचे उपसरपंच विवेक परजणे यांनी आभार व्यक्त केले.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close