जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव शहरातील टपरी माफियांचे चाळे कायमस्वरूपी बंद करा-मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील टपरी माफियांचे चाळे कायमस्वरूपी बंद करायचे असतील तर नगरपरिषदेने हॉकर्स झोन उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी नुकतीच एका प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे.

“ज्यांचे स्वतःचे गाळे आहेत,पण त्यांनी गाळे भाडोत्री दिलेले आहेत त्यांना विस्थापित समजू नये.छोट्या व्यावसायिकांना तर हटविले,पण कुठल्याही परिस्थितीत बड्यांचे अतिक्रमणे काढलीच गेली पाहिजेत.तसे होणार नसेल तर आपल्याला त्या विरोधात रस्त्यावर यावे लागेल”-विजय वहाडणे,माजी नगराध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.

कोपरगाव शहरातील विविध विकास कामांचे आगामी ०६ एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन संपन्न होत आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात दोन नगरसेवक अपात्र ठरविण्यासाठी सुरु असलेल्या सुनावणीत अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांचे अतिक्रमण सुरूच असल्याच्या पार्श्वभूमीवर ते युद्ध पातळीवर हटविण्याची मोहीम मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या नेतृत्वाखाली सुरु झाले आहे.त्यात,”आम्ही काढतो पण,आधी…त्या धेंडांचे काढा” या मागणीमुळे त्यामुळे शहरातील विस्थापितांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.त्यावर आगामी कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहे.या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी हे प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

त्यांनी पुढे म्हटले आहे की,”बारा वर्षांपूर्वी विस्थापित झालेल्याना न्याय मिळावा यासाठी आपण सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांना अनेकदा भेटलो,प्रस्ताव दिले.पण दुर्दैवाने आपण सुचविलेल्या जागांवर गाळे-खोका शॉप उभारायला परवानगी मिळाली नाही.विस्थापितांच्या प्रश्नाचे अनेकांनी राजकारण केले,निवडणुका लढविल्या राज्यात सर्व पक्ष सत्तेवर येऊन गेले,पण प्रश्न सुटलेला नाही.ज्या जागांवरील अतिक्रमणे त्यावेळी हलविली त्या जागा मात्र काही टपरी माफियांनी बळकावून भाड्याने दिल्या.त्या जागांवर व्यवसाय करणारे हातगाडीवाले-फेरीवाले-फळ विक्रेते-अंडा भुर्जीवाले यांचेकडून हप्ते वसुल करणारे तथाकथित नेते-कार्यकर्ते कोण? रहदारीच्या समस्यांमुळे व शहरात वारंवार होत असलेल्या प्रचंड कोंडीमुळे
पुन्हा एकदा अतिक्रमणे हलविली जात आहेत.काही काळानंतर पुन्हा काही माफिया पुढारी याच जागा बळकावतील व अनधिकृतपणे हप्ते वसुली करतील,नगरपरिषद अधिकाऱ्यांवर दहशत करतील.मात्र हातावर पोट भरणारे बिचारे छोटे व्यावसायिक हप्ते वसुलीबद्दल बोलू शकत नाहीत.पुन्हा असे होऊ नये यासाठी खऱ्या गरीब व्यावसायिकांसाठी हॉकर्स झोन उभारणे गरजेचे आहे.

यानंतर पुन्हा याही विस्थापितांच्या प्रश्नाचे कुणीही राजकारण करू नये यासाठी प्रशासक शांताराम गोसावी यांना आपण आवाहन करतो कि,”खऱ्या गरीब व्यावसायिकांची यादी करून त्यांना पुन्हा उठविले जाणार नाही अशा योग्य ठिकाणी त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करावा.शहरातील सर्व कर दात्यांनाही रस्त्याने वावरता आले पाहिजे.गर्दित महिला-मुलींना-विद्यार्थ्यांना व्यवस्थित जा ये करता आली पाहिजे.दोन-तीन जागांवर पार्किंग व्यवस्था करून शहरातील रहदारी सुरळीत झाली तर सर्व व्यवसाय चांगल्या पद्धतीने होतील.भंगारचा व्यवसाय करणारे,मटण विक्रेते यांची सोय करण्यात आली आहे तशीच व्यवस्था इतरही व्यावसायिकांची करण्याचे प्रयत्न करणे गरजेचे आहे.

ज्यांचे स्वतःचे गाळे आहेत,पण त्यांनी गाळे भाडोत्री दिलेले आहेत त्यांना विस्थापित समजू नये.छोट्या व्यावसायिकांना तर हटविले,पण कुठल्याही परिस्थितीत बड्यांचे अतिक्रमणे काढलीच गेली पाहिजेत.तसे होणार नसेल तर मला रस्त्यावर यावे लागेल असा इशारा दिला आहे.व स्वतःच्या आर्थिक स्वार्थासाठी,मतांचे राजकारण करण्यासाठी अतिक्रमणे करायला प्रोत्साहन देणारी प्रवृत्ती घातक आहे.कारण नुकसान व्यावसायिकांचे होते.पण हप्ते वसुली करणारे नामानिराळेच रहातात
त्यासाठी त्यांनी सिन्नर-संगमनेर बस स्थानकांचे उदाहरण दिले आहे.व त्या प्रमाणे कोपरगावच्या बस स्थानकाभोवतीही किमान दोनशे गाळे होऊ शकतात.तशी मागणीही आपण परिवहन मंत्र्यांकडे केलेली आहे.राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी प्रयत्न केल्यास तेही गाळे होऊ शकतात.स्वतः अतिक्रमणे करून पुन्हा नेतेगिरी करणारेच अतिक्रमण हटाव मोहिमेस कारणीभूत असल्याचा आरोप वहाडणे यांनी शेवटी केला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close