जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा नगर दौरा,कोपरगावात विविध उदघाटनांचा कार्यक्रम

जाहिरात-9423439946

न्यूजसेवाकोपरगाव-(प्रतिनिधी)राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,पालकमंत्री हसन मुश्रीफ,राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे यांच्या उपस्थितीत कोपरगाव बस आगार,कोपरगाव पोलीस ठाणे व कोपरगाव पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे उदघाटन बुधवार दि.०६ एप्रिल रोजी सकाळी संपन्न होणार आहे.या पार्श्वभूमीवर साई संस्थांचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी नियोजन बैठक घेण्याचे फर्मान सोडले होते त्या नुसार आज सकाळी ११ वाजता शिर्डी प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली आहे.

दि.०६ एप्रिल रोजी साधारण सकाळी १० वाजे दरम्यान साई संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांच्या मतदार संघातील कोपरगाव येथील कोपरगाव पंचायत समितीच्या समोरील कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पुतळ्याचे उदघाटन,कोपरगाव पंचायत समितीचे उदघाटन,त्या नंतर कोपरगाव बस आगार,कोपरगाव पोलीस ठाण्याच्या इमारतीचे उदघाटन संपन्न होणार आहे.

सदर प्रसंगी कोपरगाव तहसीलदार विजय बोरुडे,मुख्याधिकारी शांताराम गोसावी,कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुन काळे,गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,सदस्य मधुकर टेके,राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,शहराध्यक्ष सुनील गंगूले,तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर,प्रशांत वाबळे,सुनील शिलेदार,सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता प्रशांत वाकचौरे, आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.सदर दौऱ्यात प्रारंभी शिर्डी विमानतळावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सकाळी आठ वाजता आगमन होणार आहे.त्या नंतर शिर्डी येथील साई समाधीचे दर्शन व त्या नंतर शिर्डी येथील पोलीस ठाण्याच्या इमारतीचे उदघाटन त्यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.त्या नंतर साधारण सकाळी १० वाजे दरम्यान कोपरगाव येथील कोपरगाव पंचायत समितीच्या समोरील कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पुतळ्याचे उदघाटन,कोपरगाव पंचायत समितीचे उदघाटन,त्या नंतर कोपरगाव बस आगार,कोपरगाव पोलीस ठाण्याच्या इमारतीचे उदघाटन संपन्न होणार आहे.सदर उदघाटनांच्या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर जाहीर सभा संपन्न होणार आहे.यात बदल होऊ शकतो.त्यावेळी जिल्हयातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.त्यासाठी कोपरगाव नगरपालिका हद्दीतील रस्त्यांच्या कामास गती देण्याचे आदेश देण्यात आले आहे.मात्र या घाईगडबडीत सर्व रस्ते कसे करणार हे मोठे आव्हान पालिकेपुढे निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close