सामाजिक उपक्रम
…या ‘चॅरिटेबल डेंटल क्लिनिक’चे उद्घाटन उत्साहात

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील ‘लायन्स व लिओ क्लब ऑफ’संचलित,लायन्स चॅरिटेबल डेंटल क्लिनिक चे उद्घाटन लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल रमेश शहा यांच्या हस्त े लायन्स पार्क येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.

कोपरगाव येथील ‘लायन्स व लिओ क्लब ऑफ’विविध सामाजिक कार्यक्रम राबवत असून या वर्षी त्यांनी,’लायन्स चॅरिटेबल डेंटल क्लिनिक’चे उद्घाटन करून नागरिकांना वेगळी सेवा अर्पण केली आहे.तात्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सदर प्रसंगी व्यासपीठावर लायन्सचे माजी प्रांतपाल श्रीकांत सोनी,सुधीरजी डागा,संगमनेर येथील सुनीता पगडाल,कोपरगाव लायन्स क्लबचे अध्यक्ष सुमित भट्टड,अभिनंदन शिंगी,प्रसाद भास्कर,लिओ क्लबचे पृथ्वी शिंदे,धीरज कराचीवाला,जय बोरा,तसेच डेंटल क्लिनिक समिती सदस्य तुलसीदासजी खुबानी,सत्यन मुंदडा,राम थोरे,डॉ.अभिजीत आचार्य,राजेश ठोळे व प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉ.अंकित कृष्णानी आदीसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

सदर ‘लायन्स डेंटल क्लिनिक’ मध्ये गोरगरिबांना अगदी नाममात्र दरात सेवा मिळणार आहे व या क्लिनिकमध्ये असणारी चेअर व सर्व यंत्रसामग्री अत्याधुनिक असणार आहे अशी माहिती रमेश शहा यांनी दिली आहे.
या क्लिनिकमध्ये प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉ.अंकित कृष्णांनी रोज तीन तास सेवा देणार आहेत.दातांची निगा कशी राखावी व दंत उपचाराबद्दल माहिती डॉ.अंकित कृष्णांनी यांनी त्यांच्या भाषणा दरम्यान दिली आहे.
सदर प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष सुमित भट्टड यांनी प्रस्ताविक केले तर लायन्स क्लबच्या सर्व सेवाभावी उपक्रमाची माहिती दिली आहे.
सदर प्रसंगी रुग्णांना सवलतीच्या दरात मेडिसिन व इतर सेवा देण्याचा मानस आहे असे सत्यम मुंदडा यांनी सांगितले
उपस्थित यांचे व सर्व मान्यवरांचे आभार डेंटल क्लिनिक समिती सदस्य सत्यम मुंदडा यांनी मांडले