धार्मिक
साई संस्थान प्रशासनाला बसला चाप,रंगपंचमी उत्सव उत्साहात संपन्न,

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
श्री साईबाबा संस्थानच्या मन मानीला नागरिकांनी व साईभक्तांनी चाप लावला असून साईभक्त व नागरिकांनी केलेल्या मागणीनूसार आज रंगपंचमी निमित्त श्री साईबाबांच्या रथाची शिर्डी गावातुन मिरवणुक मोठ्या उत्साहात काढण्यात आली आहे.त्याबद्दल साईभक्तांनी समाधान व्यक्त केले आहे.
शिर्डी येथील श्री.साईबाबा संस्थान प्रशासनाने साईभक्त व नाग्रीकांच्याव विरोधापुढे मान तुकवून आज दिनांक २२ मार्च रोजी सायंकाळी ०५ वाजता रंगपंचमी निमित्ताने शिर्डी गावातून श्रींची रथयात्रा मिरवणुक काढण्यात आली होती.साई बाबा संस्थानने याबाबत आपला निर्णय बदलविल्याने साईभक्तांनीं समाधान व्यक्त केले आहे.
देशभरात सर्वत्र ‘कोव्हिड’ चे प्रतिबंध हटले असताना नगर जिल्हाधिकारी यांच्या प्रतिबंधात्मक आदेशान्वये कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव तातडीने श्रींची गुरुवारची पालखी व रंगपंचमी निमित्ताने निघणारी रथयात्रा मिरवणुक स्थगीत करण्यात आली होती.त्यामुळे साई भक्तात मोठा असंतोष पसरला होता.त्याची गंभीर दखल राज्य शासनाला घ्यावी लागली होती.याबाबत साईभक्तांची श्रध्दा व त्यांची मागणी यांचा मोठा दबाव प्रशासनावर वाढला होता.त्यानुसार श्री साईबाबा संस्थान प्रशासनाला नमते घ्यावे लागले होते.परिणामस्वरूप मंदिराची प्रथा परंपरा सुरु ठेवण्याच्या उद्देशाने संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांच्याशी तातडीने दुरध्वनीवरुन संपर्क साधुन रथयात्रा मिरवणुक सुरु करण्याबाबत मागणी करण्यात आलेली होती. त्यास मान्यता मिळाली होती.त्यानुसार आज दिनांक २२ मार्च रोजी सायंकाळी ०५ वाजता रंगपंचमी निमित्ताने शिर्डी गावातून श्रींची रथयात्रा मिरवणुक काढण्यात येणार आली होती.साई बाबा संस्थानने याबाबत आपला निर्णय बदलविल्याने साईभक्तांनीं समाधान व्यक्त केले आहे.
या वेळी संस्थानचे विश्वस्त सर्वश्री अॅड.सुहास आहेर,अविनाश दंडवते,सचिन गुजर,डॉ.एकनाथ गोंदकर,महेंद्र शेळके,उप-मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे,संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी,मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी,पुजारी,कर्मचारी,साईभक्त व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.