जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात उपमुख्यमंत्री दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमण मोहीम तीव्र,अनेक जण धास्तावले !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव नगरपरिषदेच्या कार्यालयात जाऊन दि.२२ जुलै २०२१ रोजी बांधकाम विभागात तोडफोड करण्यात येऊन उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांना मारहाण करण्याचा प्रकार घडल्यानंतर आज पुन्हा एकदा अतिक्रमण धारकांविरुद्ध नगरपरिषद व पोलीस अधिकारी यांनी रौद्र रूप धारण केले असून बस आगारानजीक असलेले अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविल्याने प्रशासनास नाक खाजवून दाखविणाऱ्या प्रवृत्तीस चाप बसण्यास मदत होणार आहे.नगर परिषदेच्या या उपक्रमाबद्दल नागरिकांनी प्रशासनाचे कौतुक केले आहे.

कोपरगाव नगरपरिषदेने आगामी ०६ एप्रिल २०२२ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे विविध उदघाटने करण्यास येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हि मोहीम सुरु केल्याचे मानले जात आहे.त्यात सकाळी बारा वाजे नंतर कोपरगाव तहसील कार्यालयातील बैठक आटोपल्यानंतर प्रशासनाने आपली मोहीम तीव्र केली होती.त्यात कोपरगाव बस स्थानकाच्या दक्षिणेकडील फाटकाजवळ व पूनम चित्रपट गृहासमोर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याचे आढळले होते.व त्यात वारंवारिता आढळत होती.त्यामुळे हि कारवाई केली आहे.त्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.

कोपरगाव शहरातील पूनम चित्रपट गृहासमोरील काही पदाधिकाऱ्यांची अतिक्रमण गतवर्षी २१ जुलै रोजी हटविले गेले होते.त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता.त्यावरून उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांना अनेक वर्षे लष्करात सेवा बजावून देशवासीयांचे संरक्षण केले त्या अधिकाऱ्यांवर हल्ला झाला होता.हि शहरासाठी खाली मान घालायला लावणारी घटना घडली होती.

कोपरगाव नगर परिषदेच्या हद्दीत दि.१० मार्च २०१० रोजी जिल्हाधिकारी यांनी आयुक्तांच्या आदेशाने माहिती अधिकार संजय काळे यांच्या मागणी आणि पाठपुराव्यातून कोपरगावातील सुमारे ०२ हजार २०० अतिक्रमणे हटविली होती.त्या वेळी नगरपरिषद हद्दीत या घटनेवरून मोठा रणसंग्राम घडला होता.तो पासून आज पर्यंत विस्थापितांच्या प्रश्नावरून आजतागायत राजकारण सुरु आहे.अशातच गतवर्षी कोपरगावात शिर्डी नगरपंचायतीचे प्रभारी मुख्याधिकारी श्री.डोईफोडे यांच्या आदेशावरून कोपरगाव शहरातील पूनम चित्रपट गृहासमोरील काही पदाधिकाऱ्यांची अतिक्रमण गतवर्षी २१ जुलै रोजी हटविले गेले होते.त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता.त्यात सामील नगरसेवक यांच्या अपात्रतेची कारवाई जिल्हाधिकारी यांच्या समोर सुरु आहे.त्यावरून उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांना अनेक वर्षे लष्करात सेवा बजावून देशवासीयांचे संरक्षण केले त्या अधिकाऱ्यांवर हल्ला झाला होता.हि शहरासाठी खाली मान घालायला लावणारी घटना घडली होती.त्याबद्दल कोपरगाव शहराच्यावतीने तत्कालीन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली होती.या घटनेतील ओरोपींनीं त्या वेळी शिवाजी महाराज व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचा बाऊ केला होता.मात्र त्याचे चलचित्रण केले असल्याने त्यांची डाळ शिजली नव्हती.त्या नंतर आज कोपरगाव नगरपरिषदेने आगामी ०६ एप्रिल २०२२ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे विविध उदघाटने करण्यास येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हि मोहीम सुरु केली असल्याचे मानले जात आहे.त्यात सकाळी बारा वाजे नंतर कोपरगाव तहसील कार्यालयातील बैठक आटोपल्यानंतर अडीच वाजेच्या दरम्यान प्रशासनाने आपली मोहीम तीव्र केली आहे.त्यात कोपरगाव बस स्थानकाच्या दक्षिणेकडील फाटकाजवळ व पूनम चित्रपट गृहाजवळ मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याचे आढळले होते.व त्यात वारंवारिता आढळत होती.एवढेच नव्हे तर हे असामाजिक तत्व नगरपरिषद प्रशासनाला नाक खाजवून दाखवत होते.ते प्रशासनाला थेट आव्हान देत होते.दरम्यान आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एक जे.सी.बी.व काही डंपर,ट्रॅक्टरच्या सहाय्याने हि मोहीम राबविण्यास सुरुवात झाली होती.विशेष म्हणजे या कारवाईत नगरपरिषदेत समाजाचे सत्त्ताधारी गटात नेतृत्व करणारे घटकच समाविष्ट आहे हि विशेष घटना आहे.

कोपरगावात अतिक्रमण मोहिम सुरु झाल्यावर आपल्या टपऱ्या काढून घेऊन जाताना नागरिक दिसत आहे.

“राज्य परिवहन मंडळाच्या कोपरगाव आगार प्रमुख यांनी अतिक्रमण असलेल्या टपऱ्या काढून घ्याव्या अशी मागणी आगार प्रमुखांची आपल्याकडे केली होती.त्यानुसार हि मोहीम राबविण्यात आली आहे.त्यामुळे हिमोहिम सुरु केली आहे”शांताराम गोसावी,मुख्याधिकारी कोपरगाव नगरपरिषद.

त्यावेळी या कारवाईवर कोपरगाव पालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले हे आपल्या चमुस घेऊन परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन आहेत.कोपरगाव नगरपरिषद निवडणूक आली हि आपल्याला कोणी काहीही कारवाई करत नाही हा पारंपरिक समज या कारवाईने आज मोडून पडला आहे.या अतिक्रमणाचा विळखा शहरात सर्वत्र पडला असून त्यात येवला रोड,धारणगाव रोड अशा मार्गावर तर विशेष चेव आला आहे.त्यास या कारवाईने अनेकांनी धाक घेतला असून स्वतः होऊन आपल्या टपऱ्या काढण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान या प्रकरणी राज्य परिवहन मंडळाच्या कोपरगाव आगार प्रमुख अभिजित चौधरी यांनी अतिक्रमण असलेल्या टपऱ्या काढून घ्याव्या अशी मागणी आगार प्रमुखांची आपल्याकडे केली होती.त्यानुसार हि मोहीम राबविण्यात आली असल्याची माहिती कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी उपस्थित माध्यम प्रतिनिधींना दिली आहे.त्याला आगार प्रमुख अभिजित चौधरी यांनी दुजोरा दिला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close