जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

अॅड. मनोज  कडू यांना राज्यस्तरीय पुरस्कार

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव येथील रहिवाशी व युवा कार्यकर्ते अड्.मनोज कडू यांना नुकताच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संस्कारमय प्रतिष्ठानचा पुरस्कार जाहीर झाला आहे.त्यांच्या या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

कोपरगाव येथील रहिवाशी असलेले अॅड. मनोज कडू हे गेल्या दहा वर्षा पासून सामाजिक व राजकीय कार्यात सक्रीय सहभागी आहे. वृक्षारोपण,अवयवदान विषयक मार्गदर्शन तसेच जनजागृती करणे, विविध आरोग्य विषयक शिबिर आयोजित करणे इ समाज उपयोगी प्रकल्प राबवत आहे . त्यांनी केलेलं सामाजिक काम लक्षात घेऊन .पुरस्कार निवड समितीने त्यांचा नावाची निवड करून त्यांना सामाजिक क्षेत्रमध्ये राज्यस्तरीय पुरस्कार साठी त्यांची निवड करण्यात आलेली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संस्कार मय प्रतिष्ठान अहमदनगर यांच्या तर्फै राजे यशवंतराव होळकर यांचा जयंती निमित्त हा पुरस्कार दिला जातो.सन २०२० करिता हा पुरस्कार अॅड. कडू यांना जाहिर केलेला आहे. सदर पुरस्कार निवड़ी संबधीचे पत्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संस्कार मय प्रतिष्ठानचे अध्यक्ष पोपटराव महारणोर व सचिव वैशाली पिसाळ यांनी दिले आहे.
सदर पुरस्कार वितरण सोहळा प्रमुख मान्यवरांचा उपस्थितीत अहमदनगर येथे आयोजित केला आहे. त्यांच्या या पुरस्काराचे निवडी बद्दल समाजाचा विविध स्तरातुन अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close