कोपरगाव तालुका
भारतीय स्त्री हा संस्काराचा खजिना-डॉ. सोनाली चिने
संपादक-नानासाहेब जवरे
कुंभारी (प्रतिनिधी )
भारतीय महिला या संस्काराच्या खजिना आहेत त्यांचा मुळेच देशातील महापुरुष घडले असल्याचे प्रतिपादन संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रा.डॉ.सोनाली चिने यांनी कुंभारी ग्रामपंचायत येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या वाचनालयात नूतच जागतिक महिला दिन आयोजित करण्यात आला होता तयावेळी ते बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. पाटील या होत्या.
सदर प्रसंगी माजी स्वातंत्र्य सैनिकाची पत्नी पद्मावती निळकंठ, ग्रामपंचायत सदस्या किरण गायकवाड,यमुनाबाई गुंजाळ,पुष्पावती चिने, विद्या थोरात, ऋतुजा ठाणगे,उषाताई घुले,संगिता वि.पवार,कल्पना चिने,सविता सोनवणे,छाया व्यवहारे, ज्योती राजगुरु यांच्यासह बहुसंख्य महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना म्हणाल्या कि,छ्त्रपतींना शिवाजी महाराज यांना घडविण्यात राजमाता जिजाऊची खरी म्हत्वाची भूमिका आहेत. महिलांना सक्षम व सुरक्षित बनविणे हे सर्वांचे आद्य कर्तव्य आहे.प्रत्येक पुरुषाच्या मागे भक्कमपणे उभी राहणारी एक स्त्री असते आणि त्या स्त्रीचे रक्षण करणे हे प्रत्येक पुरुषाचे आद्य कर्तव्य आहे.
सार्वजनिक वाचनालय कुंभारी यांच्या वतीने डॉ.सोनाली चिने यांचा शाल व श्रीफळ अध्यक्षाच्या हस्ते देऊन सत्कार केला. कार्यकमाचे आयोजन वाचनालयाचे अध्यक्ष रमण गायकवाड यांनी केले व सुत्रसंचलन रुपाली चिने यांनी केले तर उपस्थित ग्रामस्थाचे आभार रंजना गायकवाड यांनी मानले.