कोपरगाव तालुका
…थांबा ! सा…हेब झोपले आहेत !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात एरव्ही गर्दी असतेच या पोलीस ठाण्याची निर्मिती २०१५ साली तत्कालीन पालक मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते होऊन त्यांचेकडे ५५ गावे शहर पोलीस ठाण्याकडून वर्ग केली आहेत.म्हणायला आता पहिल्या इतका कार्यभार राहिलेला नसताना सुद्धा काल दुपारी दीड वाजेच्या सुमारास आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात भेट दिली असता तेथे चक्क ठाणे हवालदार साहेब चक्क आपल्या खुर्चीतच घोरताना आढळून आल्याने आमच्या प्रतिनिधीस डोक्यास हात मारून घेण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.
आता पोलिसांवर जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर स्मार्ट होण्याची वेळ आली आहे.सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.गुन्ह्याच्या पद्धती गुन्हेगारांनी आमूलाग्र बदलल्या आहेत.या पार्श्वभूमीवर पोलिसानी सावधानता बाळगायला हवीच तोच त्यांचा पहिला नियम आहे.आजही लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस अधिकारी व कर्मचारी कमी आहेच यात शंका नाही.म्हणून आहे त्यांनी झोपून आपले कर्तव्य पार पाडावे असाही त्याचा अर्थ ठरत नाही.
पोलीस हा शब्द शहर किंवा नगरराज्य आणि राज्याची परिस्थिती व राज्यघटना या अर्थांच्या ग्रीक (ग्रीक शब्दावरून Polis हे त्याचे रोमन रूपांतर) शब्दापासून निघालेला असून तो मुलकी राज्यव्यवस्था या अर्थाने प्रथम फ्रेंच भाषेमध्ये रूढ झाला. सर्व पश्चिमात्य राष्ट्रांत प्राचीन काळापासून नगरपालिका आणि तत्समान इतर स्थानिक स्वराज्य संस्थाच कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करीत असल्यामुळे कालांतराने पोलीस या शब्दाला आधुनिक अर्थ प्राप्त झाला. लोकांच्या जीवित,वित्तांचे रक्षण करणे, गुन्ह्यांना आळा घालणे, घडलेले गुन्हे हुडकून काढून आरोपीला पुराव्यानिशी न्यायासनासमोर हजर करणे, समाजात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करणे इ. कामांचा समावेश पोलिसांच्या कर्तव्यांत होतो.मात्र या खरंच सर्व पोलीस हे काम निष्ठेने करतात का ? हा प्रश्न आजची सार्वत्रीक स्थिती पाहिल्यावर आपसूकच निर्माण झाल्यावाचून राहणार नाही.
ज्यांच्यावर जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी तेच झोपले तर काय होईल हा साधासुधा प्रश्न नाही. अवघ्या काही तासात राज्यात व देशात अराजक माजल्याशिवाय राहणार नाही.दिल्लीत अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या तैनातीत पोलीस गुंतले तर असामाजिक तत्त्वांनी अवघ्या काही तासात काय केले हे वर्तमानात दूरदर्शन वाहिन्या आणि वर्तमानपत्रे नजरेखाली घातली तरी तर लगेच लक्षात येईल.
ज्यांच्यावर जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी तेच झोपले तर काय होईल हा साधासुधा प्रश्न नाही. अवघ्या काही तासात राज्यात व देशात अराजक माजल्याशिवाय राहणार नाही.दिल्लीत अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या तैनातीत पोलीस गुंतले तर असामाजिक तत्त्वांनी अवघ्या काही तासात काय केले हे वर्तमानात दूरदर्शन वाहिन्या आणि वर्तमानपत्रे नजरेखाली घातली तरी तर लगेच लक्षात येईल.मात्र हा नियम बहुधा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यास लागू नसावा अशीच स्थिती सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पाहावयास मिळाली.आमच्या प्रतिनिधीने नेहमी प्रमाणे या पोलीस ठाण्यात वृत्त संकलांर्थ भेट दिली असता तेथे आपल्या कर्तव्यावर असलेले ठाणे अंमलदार चक्क आपल्याला निद्रा देवीच्या अधीन झाले होते.आम्ही त्यांना हाका मारूनही त्यांचा निद्रानाश झाला नाही.अखेर तेथे दुसऱ्या एका दालनात एक कनिष्ठ अधिकारी बसले होते त्यांच्या हि बाब लक्षात आणून द्यावी लागली तो पर्यंत आमच्या प्रतिनिधीने त्यांच्या खुर्चीत बसून “साखर झोपेचे” छायाचित्र टिपले होते.वर्तमानात कोपरगाव शहर व तालुक्याला अधिकारी चांगले लाभल्याने बऱ्याच गुन्ह्यांना आळा बसला असला तरी अशा “झोपाळू पोलीस कर्मचाऱ्यांना” खरे तर विश्रांती द्यायला हवी.या बाबत सायंकाळी आमच्या प्रतिनिधीने या झोपाळू महाशयांना पुन्हा संपर्क साधला असता त्यांनी आपले नाव बच्छे सांगितले असून आपली तब्येत ठीक नसल्याची बतावणी केली आहे.त्यावेळी कर्मचारी वृंद इतका कमी होता कि एखाद्या गुन्हेगाराने तेथील शस्रे सहज नेऊ शकत होता.इतकी निष्काळजी पोलीस दलाला न शोभणारा असल्याच्या सार्वत्रिक प्रतिक्रिया नागरिकांच्या उमटल्या आहेत.
कोपरगाव तालुका विस्ताराने म्हणायला तसा म्हणायला खूप मोठा असून जवळपास ७९ गावे या तालुक्यात सामाविष्ट आहे.त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी साठी अर्थातच पोलीस ठाण्याची निर्मिती केली आहे.ब्रिटिश कालीन पोलीस ठाण्याने आता आपला बराच चेहरा-मोहरा बदलण्याचे काम सुरु केले आहे.आता शहर व तालुका पोलीस ठाण्यासाठी आता स्वतंत्र इमारत निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.आता पोलिसांवर जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर स्मार्ट होण्याची वेळ आली आहे.सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.गुन्ह्याच्या पद्धती गुन्हेगारांनी आमूलाग्र बदलल्या आहेत.या पार्श्वभूमीवर पोलिसानी सावधानता बाळगायला हवीच तोच त्यांचा पहिला नियम आहे.आजही लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस अधिकारी व कर्मचारी कमी आहेच यात शंका नाही.म्हणून आहे त्यांनी झोपून आपले कर्तव्य पार पाडावे असाही त्याचा अर्थ ठरत नाही.तो आमचा प्रांत नक्कीच नाही.तरीही,” स्व-संरक्षण हीच बचावाची पहिली पायरी असते” हे सांगायला कोण तज्ज्ञांची गरज नाही इतकेच या निमित्ताने.