कोपरगाव तालुका
कोळपेवाडीत दोन महिलांचा एकमेकांच्या नवऱ्यांविरुद्ध विनयभंग !
![](https://newsseva.in/wp-content/uploads/2020/03/images-73-1-731x405.jpeg)
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याच्या पश्चिमेस साधारण सोळा कि.मी.अंतरावर असलेल्या कोळपेवाडी ग्रामपंचायत हद्दीत रहिवाशी असलेल्या महिलेचा त्याच गावातील आरोपी रमेश भाऊराव भोंगळ याने बुधवार दि.४ मार्च रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास विनयभंग केल्याचा गुन्हा घरकाम करणाऱ्या ३४ वर्षीय महिलेने नुकताच दाखल केल्याने कोळपेवाडी परिसरात खळबळ उडाली आहे.दरम्यान दुसऱ्या घटनेत या आरोपीच्या पत्नीनेही पहिल्या महिलेच्या पती मंगेश सुरेश कोळेकर याचे विरुद्ध दुसऱ्या दिवशी विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याने या कायद्याचा दुरुपयोग तर होत नाहीं ना याची तालुक्यात चर्चा रंगली आहे.
कोपरगाव तालुक्यात वर्तमानस्थितीत महिलांवर होणाऱ्या अत्याचारात वाढ झाल्याचे दिसून येत असून विशेषतः कोपरगाव तालुक्याच्या पश्चिमेस या घटनात विशेष वाढ झाली आहे.त्यातच या घटना लागोपाठ घडत असून त्यात खंड पडण्याची सध्या तरी चिन्हे दिसत नाही.या बाबत स्थिती गंभीर होत चालली असून तालुका पोलिसांना कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाल्याचे नागरिकांत बोलले जात आहे. कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी ग्रामपंचायत हद्दीत नुकतीच अशीच एक घटना उघड झाली असून त्यात आरोपी रमेश भोंगळ याने फिर्यादी महिलेच्या घरात घुसून माझ्याशी संबंध ठेव असे म्हणून हात धरून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले व मी तुझा काटा काढील अशी धमकी दिली आहे. कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी गु.र.नं.७२/२०२० भा.द.वि.कलम ३५४,४५२,५०६ अन्वये आरोपी रमेश भोंगळ याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्री.ढाका हे करीत आहेत.
दरम्यान या प्रकरणात दुसरा गुन्हा दाखल झाला असून त्यात या गुन्ह्यातील आरोपीच्या पत्नीने पहिल्या गुंह्यातील फिर्यादी महिलेचे पती मंगेश सुरेश कोळेकर यांच्या विरुद्ध असाच गुन्हा दाखल करताना,”घरात जाऊन पैसे दाखवून तू माझेही शरीर संबंध ठेव म्हणून डावा हात धरून मला जवळ ओढून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले” असल्याचे आपल्या विनयभंगाचा गुन्हा दाखल करताना म्हटले आहे.या प्रकरणी पोलिसानी आरोपी मंगेश सुरेश कोळेकर याच्या विरुद्ध गु.र.नं.७३/२०२० भा.द.वि.कलाम ३५४,४५२ प्रमाणे आज गुन्हा तालुका पोलीस ठाण्यात दाखल केला असून या दोन्ही गुन्ह्याची उलटसुलट चर्चा सुरु आहे.