जाहिरात-9423439946
आरोग्य

साई जीवनदूत पुरस्काराने खोकले सन्मानित

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

शिर्डी येथील साई जीवनदूत गौरव समितीच्या वतीने देण्यात येणारा “साई जीवनदूत गौरव पुरस्कार-२०२०” हा कोपरगांव येथील अपघात व आपत्कालीन सेवेच्या विशेष योगदानाबद्दल अमित साहेबराव खोकले यांना नुकतेच एका कार्यक्रमात साई संस्थांचे मुख्याधिकारी अशोक डोंगरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे त्यांच्या या कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

अमित खोकले यांनी सन २०१५ पासून कोपरगांव परिसरात शंभरच्या वर अपघात व आपत्कालीन प्रसंगी तातडीने घटनास्थळी दाखल होत अपघातग्रस्तांना दवाखान्यात पोहचविण्याचे महत्वाचे कार्य केले आहे.त्यांच्या कार्यतत्पर सेवेमुळे अनेकांचे प्राण वाचले आहे. शिर्डी येथे नुकत्याच संपन्न झालेल्या विशेष कार्यक्रमात त्यांचा हा गौरव करण्यात आला आहे.

सदर प्रसंगी शिर्डी विभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलिस उपअधिक्षक सोमनाथ वाकचौरे, कोपरगांव तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनिल कटके ,कोपरगांव शहर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक बोरसे,सुर्योदय फायनान्सचे अधिकारी,शिर्डीच्या नगराध्यक्षा अर्चना कोते,बी.व्ही.जी.च्या कांचन बिडवे,शिर्डी वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक नितीनकुमार गोकावे,साई जीवनदूत पुरस्कार समिती अध्यक्ष अनिल डांगे,पत्रकार माधव ओझा,सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके, ग्रंथापाल योगेश कोळगे,यांचेसह सह शिर्डीतील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close