जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कुंभारीत शिवरात्री निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरेकुंभारी-(प्रतिनिधी)कुंभारी व माहेगाव येथे महाशिवरात्री निमित्त २१ व २२ ला विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने आमच्या प्रतिनिधीस देण्यात आली आहे.सालाबाद प्रमाणे याही वर्षी कुंभारी व माहेगाव येथे महाशिवरात्रीनिमित्त २१ व २२ तारखेला येणाऱ्या पूर्व काळावर गोदाकाठी असणाऱ्या पौराणिक वारसा लाभलेल्या कुंभारी व माहेगाव या तीर्थक्षेत्रावर महाशिवरात्रीच्या आयोजन होत आहे. यावेळी श्री राजेश्वरानंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली महाशिवरात्रीची राघेश्वर मंदिरात पहाटे दोन वाजेपासून विधिवत पुजाअर्चा व दुग्ध अभिषेकाने सुरुवात होते. या बहुसंख्य भाविक भक्त आपल्यालाही महाशिवरात्रीच्या निमित्ताने देवाच्या सानिध्यात रहावे म्हणून रात्रीपासूनच लोक गर्दी करतात रात्री २ पासुन सकाळी आठ वाजेपर्यंत अभिषेकाचा कार्यक्रम चालतो.यावेळी ९ ते १२ ह.भ.प बाळासाहेब रंजाळे महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ह.भ.प रामेश्वनंदगिरी महाराज यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम होईल नंतर आलेल्या भाविक भक्तांना ग्रामस्थांच्यावतीन महाप्रसादाचे आयोजन केले आहे संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत भगवान राघवेश्वरांची पालखी सोहळा होणार आहे रात्री ७ ते ९ यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमनचेच योजना करण्यात आले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close