कोपरगाव तालुका
कोपरगावात सूर्यतेजच्या वतीने शिवजयंती साजरी

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव शहरातील सूर्यतेज संस्थेच्या वतीने छत्रपति शिवाजी महाराज यांची ३८९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.भारत सरकारच्या पूर नियंत्रण केंद्राचे अभियंता धिरजकुमार सिंह यांचे शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.तसेच वृक्ष व पर्यावरण प्रेमी सुशांत घोडके यांनी वनमहोत्सव अंतर्गत पाच वर्षात सुमारे ३३ हजारचे पुढे विविध फुलं,फळ ,देशी झाडांचे रोपण आणि पालकत्व कोपरगांव व राहाता तालुक्यात केले आहे. त्याचाच भाग म्हणून शिवजयंती निमित्ताने र.म.परिख हिंदी मराठी ग्रंथालय येथे सूर्यतेजच्या स्वच्छ व हरित पर्यावरण अभियान – २०२० अंतर्गत तहसिलदार योगेश चंद्रे यांचे हस्ते वृक्षारोपण करुन पालकत्व देण्यात आले आहे.
उपस्थितांचे स्वागत सूर्यतेज संस्थापक व भारत सरकारचे स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी केले.याप्रसंगी बंडोबा चिंचपुरे,रमेश शिरोडे,बालचंदभाई लकारे,अँड.महेश भिडे,शिरिष धनवटे,दिपक शिंदे,भाऊसाहेब गुडगे,ग्रंथपाल योगेश कोळगे,आपत्कालीन सेवेचे अमित खोकले,प्रा.राजेश मंजुळ,अशोकराव आव्हाटे,राकेश टिभे,प्रमोद येवले,सुदर्शन विखे,गणेश वैद्य आदिंसह अनेक मान्यवर उपस्थित होते.