कोपरगाव तालुका
प्रज्ञाशोध परीक्षेत आत्मा मालिकचे १३ विदयार्थी गुणवत्ता यादीत
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अहमदनगर येथील डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिश्ठाणच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत ‘आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाच्या आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरूकुलाचे’ १३ विदयार्थी गुणवत्ता यादीत आले आहे त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
इयत्ता ४ थी व ७ वी तील अहमदनगर जिहयातील प्रज्ञावंत विदयार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी डॉ.हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठांणच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय अहमदनगर प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हास्तरावर २० विदयार्थ्यांची निवड केली जाते.
या यशस्वी विदयार्थ्यांमध्ये बागुल कुणाल, जगताप धिरज, संधानशिव प्रणव, चिरके भार्गव, केजभट रविराज, अरबाड ओंकार, पवार हर्श, डगळे सोर्थक, वडघणे प्रज्ञा, मोरे सत्यजित, वाबळे अनिकेत, निकम सागर, नेहरकर धनंजय आदींचा समावेश आहे.
या विदयार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे, विभाग प्रमुख सागर आहिरे,पर्यवेक्षक अनिल सोनवणे विशय शिक्षक दिपक चौधरी, कोमल जगताप, संतोश भांड , रविंद्र धावडे, मनोहर वैदय, राहूल जाधव, यांचे मार्गदर्शन लाभले आहे.या गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार शिक्षणाधिकारी ( माध्य.) दिलीप थोरे साहेब, उपशिक्षणाधिकारी रामदास हराळ, विस्तार अधिकारी राजेंद्र पवार, विनेश लाळगे यांच्या हस्ते करण्यात आला.
सर्व यशस्वी विदयार्थ्यांचे आत्मा मालिक माऊली,परमानंद महाराज, निजानंद महाराज, अध्यक्ष नंदकुमार सुर्यवशी , सरचिटणीस हनुमंत भोगळे, कोषाध्यक्ष विठ्ठल होन, विश्वस्त वसंतराव आव्हाड , प्रभाकर जमधडे , प्रकाश भट, बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गिरमे व माधवराव देशमुख, व्यवस्थापक हिरामण कोल्हे, शिक्षक आदींनी अभिनंदन केले.