कोपरगाव तालुका
माजी सैनिकांच्या ठेवींना आकर्षक व्याजदर देणार-माहिती
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भारतीय सैनिक हा प्रामाणिकपणे देश सेवा करून देशातील सर्वच जनतेचे संरक्षण करून समाजातील प्रत्येकाला शत्रूपासून सुरक्षा देत असतो त्यामुळे १५ जानेवारी हा दिवस भारतीय सेना दिवस (इंडियन आर्मी डे) साजरा करून भारतीय सैनिकांचा सन्मान केला जातो कोपरगावातील समता नागरी सहकारी पतसंस्थेने ही ‘कोपरगाव तालुका एक्स सर्व्हिसमॅन असोसिएशन’च्या माजी सैनिकांचा सन्मान करून त्यांच्या ठेवींना येत्या २६ जानेवारी पासून अर्धा टक्का व्याजदर जाहीर केले असल्याची माहिती समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश कोयटे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
“आम्ही सेवानिवृत्त होईपर्यंत भारत देशाचे संरक्षण करत असतो अनेक जवानांना देशासाठी शाहिद ही व्हावे लागते पण सेवानिवृत्तीनंतर नंतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.वेगवेगळ्या समस्यांचा विचार करून समता पतसंस्थेने आम्हा भारतातील सेवा निवृत्त सैनिकांना आजच्या दिवशी ठेवींवर अर्धा टक्का आकर्षक व्याजदर जाहीर केले आहे.हि समाधानाची बाब आहे”-युवराज गांगवे,अध्यक्ष,कोपरगाव तालुका एक्स सर्व्हिसमॅन असोसिएशन.
समता नागरी सहकारी पतसंस्थेत १५ जानेवारी हा दिवस “इंडियन आर्मी डे” म्हणून साजरा केला जातो.या दिवसाचे औचित्य साधून कोपरगाव तालुका एक्स सर्व्हिसमॅन असोसिएशनचे अध्यक्ष युवराज गांगवे,उपाध्यक्ष मारुती कोपरे,सदस्य बाळासाहेब वाघ,मधुकर इनामके,पंकज झावरे,रामनाथ वर्पे आदींचा समता पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांच्या हस्ते समता महिला बचत गटाच्या महिलांनी कलाकुसर करत अगरबत्ती व कापूर एकत्र बांधून तयार केलेला गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.प्रसंगी ते बोलत होते
तसेच ते पुढे म्हणाले की,”महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत समता गेली असून त्यांना विश्वास आणि सुरक्षितता प्रदान करत आहे.समता पतसंस्था महाराष्ट्रातील सर्वसामान्य व्यक्तीपासून ते प्रथम श्रेणी अधिकाऱ्यांपर्यंत समताच्या वेगवेगळ्या योजना,उपक्रम आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घेऊन जात आहे.त्या योजना उपक्रमांचा ग्राहक, सभासदाला फायदेशीर कशा ठरतील या दृष्टीने देखील समताचा प्रत्येक कर्मचारी सभासदांना सेवा देत असतो.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मुख्य कार्यालयाचे एच.आर.श्रीमती उज्वला बोरावके यांनी केले.महा व्यवस्थापक सचिन भट्टड,मुख्य कार्यालयाचे अधिकारी,कोपरगाव शाखेचे शाखाधिकारी आप्पा कोल्हे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.उपस्थितांचे आभार शाखाधिकारी आप्पा कोल्हे यांनी मानले आहे.