निधन वार्ता
भाऊसाहेब थोरात यांचे निधन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी व संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे सेवा निवृत्त कर्मचारी बाबासाहेब (उर्फ भाऊसाहेब)भागूजी थोरात (वय-७३) यांचे नुकतेच नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात पत्नी,दोन मुले,तीन मुली,असा परिवार आहे.त्यांच्यावर जवळके येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
स्व.भाऊसाहेब उर्फ बाबासाहेब थोरात यांनी आपल्या शिक्षणानंतर ते संजीवनी साखर कारखान्यात सेवेत होते.ते २००९ साली सेवा निवृत्त झाले होते.त्या नंतर त्यांनी शेती व्यवसायात स्वतःला झोकून दिले होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.