जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात पुन्हा “माझे कुटुंब,माझी जबाबदारी”मोहीम राबवणार

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.या विपरीत स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी संपूर्ण कोपरगाव विधानसभा मतदार संघात,”माझे कुटुंब,माझी जबाबदारी” मोहीम राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी या आरोग्य तपासणीस सहकार्य करावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.

राज्यासह कोपरगावातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आ.काळे यांनीही हि योजना तालुक्यात राबविण्याचे संकेत दिले आहेत.

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढत आहे.कोपरगावात हिच बाब अधोरेखित झाली आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात तो आणखी वाढण्याची शक्यता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केली.पुनश्च हरीओम अर्थात मिशन बिगिन अगेनला पुन्हा सुरुवात केली आहे.कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आ.काळे यांनीही हि योजना तालुक्यात राबविण्याचे संकेत दिले आहेत.त्यामुळे बिघडलेल्या परिस्थितीवर हवे तसे नियंत्रण मिळविण्यासाठी महाविकास आघाडी सरकारची महत्वाकांक्षी,”माझे कुटुंब,माझी जबाबदारी” मोहीम राबविली जाणार आहे.कोरोनाचे मतदार संघातून समूळ उच्चाटन करायचे असेल शेवटच्या कोरोनाबधित रुग्णापर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे व त्यासाठी मतदार संघातील प्रत्येक कुटूबाची आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे.मागील वर्षी माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या माध्यमातून आरोग्य विभागाच्या वतीने नगरपरिषद व ग्रामपंचायत मार्फत करण्यात आलेल्या आरोग्य तपासणीला मतदारसंघातील नागरिकांनी प्रतिसाद दिल्यामुळे आपण कोरोनावर नियंत्रण मिळवू शकलो.हेच सहकार्य नागरिकांनी पुन्हा एकदा करून तपासणीसाठी आलेल्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करून आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची आरोग्य तपासणी करून घ्यावी. कुटुंबातील सदस्याला कोणत्याही स्वरूपाचा शारीरिक त्रास असल्यास त्याची माहिती सांगावी. या तपासणीच्या माध्यमातून कोरोनाचे प्राथमिक लक्षणे असलेल्या रुग्णांवर वेळेत उपचार होऊन त्यांचे आरोग्य अबाधित राहणार आहे. त्यासाठी नागरिकांनी आपले कर्तव्य समजून आपल्या कुटुंबाची आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन आ.काळे यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close