जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा स्मृतिदिन उत्साहात साजरा

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

भारतीय जनता पक्षाच्या मुळ कार्यकर्त्यांनी कोपरगाव येथील भा.ज.पा.चे गुरुद्वारा रोड येथील मुख्य कार्यालय “वसंत स्मृती”येथे भारतीय जनता पक्षाचे संस्थापक व “एकात्मता मानववाद” सिद्धांतवादाचे जनक स्व. पं. दीनदयाळ उपाध्याय,यांचा स्मृती दिन मोठ्या उत्साहात साजरा केला आहे.

पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत यांचा महत्त्वाचा वाटा होता. भारतीय जनसंघातून पुढे भारतीय जनता पक्षाचा उगम झाला.दीनदयाळ उपाध्याय १९३७ साली कानपूर येथे संघाचे स्वयंसेवक झाले व १९४२ मध्ये प्रचारक झाले.

साधी राहणी व उच्च विचारसरणी हा त्यांचा स्थायीभाव होता. शास्त्रे, धर्मग्रंथ, आणि तात्त्विक ग्रंथांच्या चिंतनातून व मननातून त्यांनी ‘एकात्ममानववाद’ हा सिद्धान्त मांडला व भारतीय समाजापुढे ठेवला.त्यांची मंगळवार दि.११ फेब्रुवारी रोजी पुण्यतिथी होती.त्या निमित्त या स्मृतिदिनाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रा.सुभाष शिंदे हे होते.

सदर कार्यक्रमास भाजपचे जेष्ठ नेते रामदास खैरे,कोपरगाव पालिकेचे अध्यक्ष विजय वहाडणे, प्रकाश सवाई, भाजप मिडीया सेलचे समीर आंबोरे, माजी तालुका अध्यक्ष सुभाष दवंगे, विजय जोशी,शहर-सरचिटणीस चेतन खुबाणी,किरण थोरात,नगरसेवक संजय काबंळे,रविंद्र बागरेचा,मनोहर कृष्णाणी, श्रीयुत भोकरे, सुरेश कांगोणे,संजय कानडे आदी कार्यकर्ते हजर होते.

कार्यक्रमाचे प्रारंभी प्रकाश सवाई यांच्या हस्ते पंडितजींच्या “पवित्र प्रतिमेला “पुष्पमाला अर्पण करण्यात आली.त्या नंतर चेतन खुबाणी यांनी प्रास्तवित केले, प्रा. सुभाष शिंदे, यांनी स्व. दीनदयाळ यांच्या, एकात्मवादा वर आपले विचार मांडले, सुभाष दवंगे यानीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. उपस्थितांचे आभार किरण थोरात यांनी मानले.यावेळी पक्षाच्या शहर व तालुका स्थरावरील संघटनात्मक कार्याचा आढावा घेतांना पुढील संघटनात्मक कामाची व्यवस्था करण्याचे निश्चित करण्यात आले.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close