जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

शासकिय चित्रकला परीक्षेत गौतम पब्लिक स्कूलची परंपरा कायम

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

सप्टेंबर २०१९ मध्ये झालेल्या शासकिय चित्रकला परीक्षांचा निकाल नुकताच जाहिर झाला असुन त्यात गौतम पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यानी लक्षवेधी संपादन केले आहे.इलेमेंटरी चित्रकला परीक्षेत शाळेतील एकूण ७१ विद्यार्थी व इंटरमीजीएट परीक्षेस २७ विदयार्थी बसले होते. या परीक्षेत एकूण ९८ विदार्थ्यापैकी सर्वच विदार्थ्यानी घवघवीत य संपादन केलेले आहे. शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

या परीक्षेत सिध्दी क्षिरसागर, साई चव्हाण, भारती निधी, शेख आनम, हर्षल सुर्यवंशी हे ०५ विद्यार्थी ‘अ’ श्रेणीत तर ३४ विद्यार्थी ‘ब’ श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहे.शासकिय चित्रकला परीक्षेत कोळपेवाडी केंद्रातून गौतम पब्लिक स्कूलने सर्व शाळांच्या तुलनेत सर्वोच्च निकालाची पंरपरा राखलेली आहे.सध्याच्या युगात करिअर करण्याच्या सर्वाधीक संधी कला क्षेत्रात उपलब्ध आहेत. कला क्षेत्राचा अर्थ चित्रकारीता, गायन, नृत्य, संगित अशा अनेक क्षेत्रात कलाकारांसाठी चांगल्या संधी उपलब्ध आहेत आणि या सर्व कला प्रकारामध्ये गौतम पब्लिक स्कूलचे विद्यार्थी आपला ठसा उमटवत आहे. शाळेत वेगवेगळे उपक्रम राबवून विदार्थ्याच्या कलागुणांना वाव देवून विद्यार्थ्यामधील अभिव्यक्ती सृजनशिल करण्यासाठी गौतम पब्लिक स्कूलमध्ये सतत वेगवेगळे प्रयोग करून शाळेच्या नावलौकीकात भर टाकत असल्याची अशी माहीती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली. या सर्व यस्वी विद्यार्थ्याना शाळेचे कलाशिक्षक गोरक्षनाथ चव्हाण, ज्योती शेलार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. विद्यार्थ्यानी मिळविलेल्या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्याचे व कला शिक्षकाचे संस्थेचे अध्यक्ष व माजी आ.अशोक काळे, विश्वस्त आ. आशुतोष काळे,उपाध्यक्ष छबुराव आव्हाड, कारभारी आगवण, सचिव सौ.चैतालीताई काळे तसेच सर्व संस्था सदस्यांनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close