जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यात केनयार्ड नजीक अपघात,एक जागीच ठार

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी ग्रामपंचायत हद्दीत कर्मवीर काळे कारखान्याच्या केनयार्ड ते कोळपेवाडी या मार्गावर कोळपेवाडीकडे जात असताना त्याच गावातील इसम संजय रघुनाथ चव्हाण (३९) यास मागील बाजूने आलेल्या उसाचा ट्रकने (एम.एच.१७ ए.६०८९) जोराची धडक दिल्याने व सदरचा इसम ट्रकच्या खालीच सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याची फिर्याद मयताचे बंधू नानासाहेब रघुनाथ चव्हाण (वय-४३) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

संकल्पित छायाचित्र

रविवारी सायंकाळी ६.३० वाजता त्यांना मागील बाजूने भरधाव वेगाने येणाऱ्या ऊसाचा ट्रकने धडक देऊन जागीच ठार केले आहे.या घटनेत मयताच्या डोक्यावरून अवजड ट्रकचे चाक गेले त्यात त्यात त्यांच्या डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगीतले आहे.या घटनेनंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

संकल्पित छायाचित्र

सदरचे सविस्तर वृत्त असे कि,कोपरगाव तालुक्यातील सहकारी साखर कारखान्यांचा ऊस गळीताचा हंगाम सध्या जोरात सुरु आहे.या हंगामामुळे तालुक्यात वाहनाची आवक-जावक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.त्यामुळे या वाहनाच्या गर्दीमुळे सामान्य नागरिकांचे जीवनमान धोक्यात आले आहे.अशीच घटना कोळपेवाडी ग्रामपंचायत हद्दीत घडलि असून रविवार दि.२ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या साडेसहाच्या सुमारास कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या केनयार्ड रस्त्यावरुन कोळपेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून त्याच गावातील इसम संजय चव्हाण हे आपल्या काही कामासाठी कोळपेवाडीकडे जात असतानासायंकाळी ६.३० वाजता त्यांना मागील बाजूने भरधाव वेगाने येणाऱ्या ऊसाचा ट्रकने धडक देऊन जागीच ठार केले आहे.या घटनेत मयताच्या डोक्यावरून अवजड ट्रकचे चाक गेले त्यात त्यात त्यांच्या डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगीतले आहे.या घटनेनंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.या घटनेची खबर काही नागरिकांनी त्यांच्या घरच्या नातेवाईकांनी सांगितली त्या नंतर त्यांच्या बंधु नानासाहेब चव्हाण यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात या बाबत गु.र.न.३१/२०२०,भा,द.वि.कायदा कलम ३०४,२७९,१८४,अन्वये अज्ञात ट्रकचालकविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. सतीश भताने हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close