जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावच्या “…त्या”दादांकडून ट्रक चालकाची लूट,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील नगर-मनमाड मार्गावर मारुती शोरूम जवळ व अशोका हॉटेल समोर आज पहाटेच्या सुमारास पावणे सहाच्या सुमारास फरशी घेऊन उभा असलेला ट्रक चालक,मालक व क्लीनरला हाती असलेल्या कत्तीचा धाक दाखवून”आम्ही कोपरगावचे “दादा” असून तुम्हाला जिवंत राहायचे असेल तर तुमच्या कडील असेल-नसेल ती सर्व रक्कम द्या.अशी धमकी देऊन त्यांच्या पाकिटातील पंधरा हजारांची रक्कम काढून घेऊन पोबारा केल्याची फिर्याद आज ट्रकमालक बाळासाहेब चांगदेव शिंदे रा.धोत्रे (वय-४४) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

कोपरगावात ट्रक उभा करुन आपल्या गाडीत बसलेले असताना सकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास त्यांना काही इसम ट्रकची खिडकी उघडण्यासाठी व बिलटी पाहण्यासाठी काही इसम हाक मारत असल्याचे दिसून आले.त्यांनीं या इसमांना त्यात फरशी असल्याचे सांगितले मात्र त्यांनी खिडकी उघडण्याचा आग्रह धरला त्यावेळी यांना कदाचित पोलीस असतील या धाकाने ट्रकचा दरवाजा उघडला असता त्यांना तीन इसम दिसून आले. त्यातील दोघे आत गाडीत आले.तिसरा हातात कत्ती हातात घेऊन दरवाजात उभा होता.हे वयाने साधारण २५-२७ वयातील तरुण होते. त्यांनी गाडीत आत आल्यावर,शिवीगाळ करून पैसे दे,नाहीतर तुझे हातपाय काढील भाडखाऊ, तुला जगायचे आहे का ? तुला जीव नकोसा झाला आहे का ? असे म्हणून बाहेर दरवाजात उभा असलेल्या आरोपीने आतील आरोपीकडे कत्ती दिली.व आम्ही कोपरगावचे “दादा” आहोत असे म्हणून आपल्या गळ्याला कत्ती लावली व असेल नसेल ते सर्व पैसे काढा.असे म्हणाला

सदरची सविस्तर वृत्त असे कि,कोपरगाव तालुक्यातील धोत्रे ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी असलेले ट्रक मालक बाळासाहेब शिंदे यांनी आपल्या ट्रक मध्ये गुजरात राज्यातील मोरबी येथून आपल्या ट्रकमध्ये कोपरगावला अनुपभाई पटेल यांच्या दुकानात खाली करण्यासाठी फरशी भरली व ती गाडी घेऊन ते आज पहाटे लवकरच कोपरगावात आले मात्र एवढ्या सकाळी दुकान उघडत नाही म्हणून त्यांनी कोपरगावात मारुती शोरूम जवळ अशोका हॉटेल समोर आपला ट्रक उभा केला.व रात्री बसलेले असताना सकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास त्यांना काही इसम ट्रकची खिडकी उघडण्यासाठी व बिलटी पाहण्यासाठी काही इसम हाक मारत असल्याचे दिसून आले.त्यांनीं या इसमांना त्यात फरशी असल्याचे सांगितले मात्र त्यांनी खिडकी उघडण्याचा आग्रह धरला त्यावेळी यांना कदाचित पोलीस असतील या धाकाने ट्रकचा दरवाजा उघडला असता त्यांना तीन इसम दिसून आले. त्यातील दोघे आत गाडीत आले.तिसरा हातात कत्ती हातात घेऊन दरवाजात उभा होता.हे वयाने साधारण २५-२७ वयातील तरुण होते. त्यांनी गाडीत आत आल्यावर,शिवीगाळ करून पैसे दे,नाहीतर तुझे हातपाय काढील भाडखाऊ, तुला जगायचे आहे का ? तुला जीव नकोसा झाला आहे का ? असे म्हणून बाहेर दरवाजात उभा असलेल्या आरोपीने आतील आरोपीकडे कत्ती दिली.व आम्ही कोपरगावचे “दादा” आहोत असे म्हणून आपल्या गळ्याला कत्ती लावली व असेल नसेल ते सर्व पैसे काढा.असे म्हणाला त्याच वेळी दुसऱ्या आरोपीने माझ्या कडील व क्लिनर संतोष कचरू जाधव याचे कडील पाकीट हिसकावून घेतले.व आपले काम फत्ते झाल्यावर घटनास्थळावरून पोबारा केला आहे .या घटनेने ट्रकचालक,मालक क्लिनर असे तिघेही हबकून गेले असून त्यांनी दिवस उगावल्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजी.क्रं.२४/२०२० भा.द.वि.कलम ३९२,३४ प्रमाणे अज्ञात तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close