कोपरगाव तालुका
मनसेचे कोपरगावात आपल्या मागण्यासाठी शनिवारी उपोषण
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोपरगाव शहरातील स्वामी समर्थ रोड ते कोर्ट रोड यावरील झालेले अतिक्रमण काढण्यासह अन्य मागण्यासाठी शनिवार दि.२५ जानेवारी कोपरगाव नगरपरिषदेसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.त्यामुळे अतिक्रमण धारकात भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोपरगाव शहरात मार्च २०११ साली अतिक्रमण मोहीम जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात आली. त्यावेळी सुमारे दोन हजार दुकाने हटविण्यात आली. त्यावेळी अनेक राजकीय नेत्यांनी आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन विस्थापितांना न्याय देण्याच्या बाता मारल्या मात्र प्रत्यक्षात कोणीही खरे उतरले नाही.अनेक वेळा अनेक निवडणुकात या नागरिकांना आश्वासनाची खैरात करण्यात आली. मात्र ती सर्व आश्वासने हवेत विरली.आज जवळपास दहा वर्षाचा कालखंड उलटत येऊनही या नागरिकांना व व्यापाऱ्यांना न्याय मिळाला नाही.उलट दर निवडणुकीत त्यांच्या जखमेला मीठ चोळण्याचे काम राजकीय नेत्यांनी केले.वर्तमानात कोपरगाव शहरातील पोलीस ठाणे ते कोर्ट रोड या दरम्यान नागरिकांची व वाहनाची मोठी गर्दी असते या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जुना रस्ता असलेला स्वामी समर्थ रस्ता ते कोर्ट रस्ता अतिक्रमण काढून मोकळा केला तर वाहतुकीचा बराच ताण कमी होईल.मात्र या कडे नगरपरिषद दुर्लक्ष करीत आहे.या निषेधार्थ मनसेने हे आंदोलन पुकारले आहे.आता नगरपरिषद या बाबत काय भूमिका घेते या कडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.निवेदनावर शहराध्यक्ष सतीश काकडे,अलिमभाई शहा,संतोष गंगवाल,रघुनाथ मोहिते,आनंद परदेशी,आदींच्या सह्या आहेत.