जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

या गावात महिलेला घरात घुसून मारहाण,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील चांदगव्हाण ग्रामपंचायत येथील महिलेला डाऊच येथील आरोपी अर्जुन उर्फ सोनू पोपट शिंदे याने काठीने घरात घुसून मारहाण केली असल्याची तक्रार कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी महिला मुताबाई प्रभाकर शिंदे (वय-४२) यांनी दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

फिर्यादी महिला हि आपल्या पती ,मुलगा यांच्या समवेत चांदगव्हाण ग्रामपंचायत हद्दीत राहते.या महिलेचे पती त्या दिवशी बाहेरगावी गेलेले असताना त्यांचा आरोपी पुतण्या अर्जुन पोपट शिंदे हा डाऊच ग्रामपंचायत हद्दीत राहतो.तथापि गुरुवार दि.१६ जानेवारी रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास आरोपी हा आपल्या अन्य चार अनोळखी मित्रांना घेऊन त्याच्या घरासमोर रात्रीच्या सुमारास आला व बाहेरगावी गेलेल्या पतीच्या नावाने जोरजोरात वाईट-साईट शिवीगाळ करत होता त्यास नेमके काय झाले आहे व तो नेमका कोणाला शिवीगाळ करत आहे.हे पाहण्यासाठी आपण आपल्या मुलाला घराच्या बाहेर पाठवले असताना त्याने ,”माझे वडिलांचे नावाने का शिवीगाळ करतो” असे विचारले असता आरोपी अर्जुन शिंदे याने,” मी प्रभाकर यास भ्रमणध्वनिवरून शिवीगाळ केली होती त्याने त्या बाबत आपल्या वडिलांना का सांगितले” म्हणून एक काठी हातात घेऊन घरात घुसून काठीने आपल्याला पायाचे पोटरीवर, मांडीवर मारहाण केली आहे.मला वाचविण्यासाठी माझा मुलगा मध्ये पडला असता त्याने त्यासही पायावर मारहाण करून आमच्यावर दहशत केली आहे.व जीवे मारण्याची धमकी दिली आहे.त्याच्या सोबत आलेल्या अन्य अनोळखी काही जणांनी आपल्याला शिवीगाळ केली आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.र.नं.२२/२०२० भा.द.वि.कलम ४५२,३२४,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस.जी.ससाणे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close