जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

एकलव्य आदिवासी बहुजन पार्टीच्या वतीने तंट्या तात्यास अभिवादन

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

आदिवासी क्रांतिकारक तंट्या नाईक यांच्या हुतात्मा दिनानिमित्त एकलव्य संघर्ष ग्रुप महाराष्ट्र राज्य एकलव्य आदिवासी बहुजन पार्टीच्या वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नुकतीच दुचाकी फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष रेवनाथ जाधव हे होते.

मध्य प्रांतातील निमाड जिल्ह्यातील एका खेड्यात १८४२ साली तंट्या भिल्ल यांचा जन्म झाला. त्याच्या वडिलांचे नाव भाऊसिंग होते. भिल्लांना स्वसंरक्षणासाठी लहानपणापासून भालाफेक आणि धनुष्यबाण चालवण्याचे शिक्षण मिळे. या युद्धकलांमध्ये तंट्या तरबेज होता.१८७८ ते १८८९ या अकरा वर्षांच्या काळात सावकार-मालगुजारांचा कर्दनकाळ बनलेला होता तसेच त्यांनी ब्रिटिशांची झोप उडवली होती.

आदिवासी-बहुजन समाज बांधवाच्या जनजागृतीसाठी देर्डे चांदवड येथे तंट्या तात्या नाईक यांच्या हुतात्मा दिनानिमित्त कोपरगाव महिला आयोग प्रशासकीय अधिकारी झाल्टे मॅडम,माननीय थोरात,वकील श्री मगर,मुकेश निलकर,रेवनाथ जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत कायदेविषयक शिबिर घेण्यात आले. या कार्यक्रम यशस्वीतेसाठी देर्डे चांदवड येथील अरुण पवार,राहुल पवार आदींनी परिश्रम घेतले.हि दुचाकी फेरी तालुक्यातील सुरेगाव,वेळापुर,कोळगावथडी,कोळपेवाडी,मढी,देर्डे-चांदवड,पोहेगाव-पंचकेश्वर,वेस,डाऊच,कुभांरी,हांडेवाडी,कारवाडी,मंजूर,सांगवीभुसार,धनगरवाडी,तारुखेडले,चासनळी,वडगाव-बक्तरपुर,संवत्सर- कोकमठाण,सायाळे,मळेगावथडी,रवंदा,शहाजापुर माहेगाव देशमुख,मायगावदेवी,मुर्शतपुर,धारणगाव तसेच सिन्नर,निफाड,नेवासा,चाळीसगाव येथुन अनेक मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close